नाशिकमध्ये वयस्क महिलेवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: July 14, 2015 00:40 IST2015-07-14T00:40:56+5:302015-07-14T00:40:56+5:30

द्वारकेजवळील नासर्डी पुलालगतच्या झोपडीत राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यापैकी पतीस मारहाण करीत, ५५ वर्षीय महिलेवर तिघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार

A gang rape of adult women in Nashik | नाशिकमध्ये वयस्क महिलेवर सामूहिक बलात्कार

नाशिकमध्ये वयस्क महिलेवर सामूहिक बलात्कार

नाशिक : द्वारकेजवळील नासर्डी पुलालगतच्या झोपडीत राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यापैकी पतीस मारहाण करीत, ५५ वर्षीय महिलेवर तिघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवार मध्यरात्री घडली़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील तिन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे़ त्यांना १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
मध्यरात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास संशयित सुरज सुनील तसंबड (२५), अनिल सुनील तसंबड (२५) व योगेश फावरी (४५) हे बळजबरीने झोपडीत घुसले़ त्यांनी पतीस झोपडीच्या बाहेर नेऊन बेदम मारहाण केली, यानंतर या तिघांनी पत्नीवर आळीपाळीने बलात्कार केला, अशी तक्रार पीडित महिलेने दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: A gang rape of adult women in Nashik