अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा गजाआड

By Admin | Updated: December 4, 2015 03:05 IST2015-12-04T03:05:55+5:302015-12-04T03:05:55+5:30

गंगानगर एक्स्प्रेसच्या शौचालयात केले होते कुकर्म.

A gang of atrocities against a minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा गजाआड

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा गजाआड

अकोला - नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेसच्या शौचालयात एका १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा रिझवान शाह अयूब शाह याला रेल्वे पोलिसांनी गुरुवारी अटक केली. ६ जुलै रोजी त्याने या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. आकोट फैलमधील इंदिरानगर येथील रहिवासी रिझवान शाह अयूब शाह याला अकोला रेल्वे स्थानकावर ६ जुलै रोजी राजस्थानमधील बिकानेर येथील रहिवासी अल्पवयीन मुलगी एकटी आढळली. त्याने तिच्याशी लगट साधली. काळी वेळातच ती मुलगी नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेसमध्ये आरक्षित डब्यामध्ये बसली. या मुलीच्या पाठोपाठ रिझवानही गाडीत बसला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ती आरक्षित डब्यातील शौचालयात गेली असता, रिझवानने पाठलाग करून तिला शौचालयात कोंडले आणि तिचे तोंड बांधून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी मुलीने जीआरपी पोलीस ठाण्यात तक्रार दिली; मात्र पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेऊन, पीडित मुलीस मलकापूर येथील गायत्री बालकाश्रमात दाखल केले. याप्रकरणी मुलीची महिला व बालकल्याण समितीने चौकशी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. या समितीने दिलेल्या अहवालानंतर रेल्वे पोलिसांनी रिझवान शाह अयूब शाहविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ आणि पॉस्को अँक्टनुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला गुरुवारी आकोट फैलमधील इंदिरानगर येथून अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

Web Title: A gang of atrocities against a minor girl