शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाची सुरूवात पावसाने; महाराष्ट्रातील बर्‍याच भागांत संततधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 20:51 IST

गेल्या २४ तासात कोकण आणि गोवा येथे गडगडाटासह चांगला पाऊस झाला असून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली.

मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रातील बर्‍याच भागांत गणेश चतुर्थीच्या सणाची सुरुवात पावसाने झाली. पावसामुळे राज्यातील बहुतांश भागातील हवामान सुखद झाले आहे. गेल्या २४ तासात कोकण आणि गोवा येथे गडगडाटासह चांगला पाऊस झाला असून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पडला आहे. स्कायमेटकडे उपलब्ध असलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत रविवार सकाळी साडेआठपासून हर्णेमध्ये ९१ मिमी, डहाणूमध्ये ५१ मिमी,वेंगुर्लामध्ये ४८ मिमी,ब्रह्मपुरीमध्ये ४५ मिमी आणि रत्नागिरीमध्ये ४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

स्कायमेट हवामान तज्ज्ञांनी पुढील दोन दिवस विदर्भातील काही भागात एक ते दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस आणि मराठवाड्यात मध्यम सरी बरसण्याचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, कोकण आणि गोवा येथे मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहील. या कालावधीत मुंबईत एक किंवा दोन मध्यम सरींची शक्यता आहे, परंतु मुसळधार पावसाची कोणतीही शक्यता नाही.

मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि नाशिकसारख्या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतील. पुढील दोन ते तीन दिवस हवामान ढगाळ व आरामदायक राहील. या सर्व हवामान परिस्थितीचे श्रेय गुजरातमधील चक्रवाती परिभ्रमणाला दिले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, महाराष्ट्र किनारपट्टीवरील कमकुवत ट्रफ रेषेमुळे मान्सून ची सक्रिय अवस्था आहे.

स्कायमेटच्या आकडेवारीनुसार १ जून ते १ सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील पावसाची २१% कमतरता वगळता महाराष्ट्रातील अन्य सर्व हवामान विभागांमध्ये पावसाचे आधिक्य आहे.

टॅग्स :Rainपाऊस