गणेशोत्सव - कोल्हापुर मध्ये एक खिडकी योजनेस प्रारंभ...
By Admin | Updated: August 25, 2016 18:28 IST2016-08-25T18:28:38+5:302016-08-25T18:28:38+5:30
र्मादाय आयुक्त याच्या परवानगी साठी प्रशासनाच्या वतिने बुधवार पेठेतील उपविभागीय पोलीस अधीकारी शहर विभाग याच्या कार्यालया मध्ये एक खिडकी योजनेला सुरुवात

गणेशोत्सव - कोल्हापुर मध्ये एक खिडकी योजनेस प्रारंभ...
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 25 - गणेशोत्सव अवघ्याकाही दिवसावर आला आहे.तरुण मंडळाच्या तयाीला वेग आला आहे.जिल्हा प्रशासनाच्या वतिने याहीवर्षी गणेशोत्सवासाठी लागणारी पोलीस स्टेशन,फायर स्टेशन,साऊंड सिस्टम,महानगर पालीका,रस्ते खुदाई व धर्मादाय आयुक्त याच्या परवानगी साठी प्रशासनाच्या वतिने बुधवार पेठेतील उपविभागीय पोलीस अधीकारी शहर विभाग याच्या कार्यालया मध्ये एक खिडकी योजनेला सुरुवात करण्यात आली आहे.
या कार्यालयाच्या कडुन गतसाली राजवाडा २५३,शाहुपुरी२४६,लक्ष्मीपुरी१६४व राजारामपुरी२४६ अशा चार पोलीस स्टेशन च्या हद्दीतुन ९०९ तरुण मंडळानी परवानगी घेतली होती. यंदा पोलीस प्रशासनाने डाँल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करायचा असा निश्चय केल्याने परवागी अर्जासोबत मंडळाच्या अध्यक्ष व सदस्य ना ध्वनी मर्यादा उल्लघन नकरणे बाबतच्या नोटीस लागु करण्यात येत आहेत.