अंबाजोगाईत साजरा होतोय कन्या गणेशोत्सव
By Admin | Updated: September 14, 2016 11:28 IST2016-09-14T11:28:46+5:302016-09-14T11:28:46+5:30
कॉलनीत दरवर्षी मुले एकत्र यायची आणि गणेशाची स्थापना करायचे. यावेळी मात्र कॉलनीतील मुलींनी एकत्र येऊन कन्या गणेश मंडळाची स्थापना केली.

अंबाजोगाईत साजरा होतोय कन्या गणेशोत्सव
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १४ - कॉलनीत दरवर्षी मुले एकत्र यायची आणि गणेशाची स्थापना करायचे. यावेळी मात्र कॉलनीतील मुलींनी एकत्र येऊन कन्या गणेश मंडळाची स्थापना केली आणि गणेशोत्सवासाठी जमलेल्या पैशातून देखावा साजरा करतानाच काही रक्कम एडस् बाधीत मुलांच्या संस्थेसाठी मदत म्हणून देण्याचा निर्णयही घेतला.
अंबाजोगाई शहरातील दीनदयाळ वसाहतीमध्ये सर्व मुलींनी एकत्र येऊन यावेळी मुलीच गणेशोत्सव साजरा करणार असल्याची कल्पना मांडली. पालकांनीही त्याला प्रतिसाद दिला. गणेश भक्ताचे आकर्षण असलेल्या मुलींनी एकत्र येउन बसविलेल्या गणेश स्थापनेचे शहरात कौतुक होत असून या वर्षी सर्वत्र चर्चा असलेला अवयव दान , स्वच्छ भारत व वृक्ष संवर्धन असा संदेश देणारा देखावा त्यांनी सादर केला आहे.
गणेशोत्सव नियोजनासाठी संपदा व शुभदा हिवरेकर,साक्षी तोडीवाले,जान्हवी चिक्षे,श्रावणी व शर्वरी घन वर्षा डाके, विधीता माने योगेश्वरी कुलकर्णी,श्रेया आपेट याच्यांसह अनेक मुलींचा पुढाकार आहे.