गांधी-इधी मोहीम सुरू करणार - सुधींद्र कुलकर्णी

By Admin | Updated: July 20, 2016 02:20 IST2016-07-20T02:20:46+5:302016-07-20T02:20:46+5:30

भारत पाक शांततेसाठी ‘आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन’तर्फे ‘‘गांधी-इधी मोहिम’ सुरू करण्यात येणार आहे.

Gandhi-iTi campaign will be launched - Sudheendra Kulkarni | गांधी-इधी मोहीम सुरू करणार - सुधींद्र कुलकर्णी

गांधी-इधी मोहीम सुरू करणार - सुधींद्र कुलकर्णी


मुंबई : भारत पाक शांततेसाठी ‘आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन’तर्फे ‘‘गांधी-इधी मोहिम’ सुरू करण्यात येणार आहे. फाउंडेशनने नव्याने सुरू केलेल्या ‘मुंबई कराची फ्रेंडशीप फोरम’ अंतर्गत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ‘सर्व्ह ह्युमॅनिटी- प्रमोट इंडो पाक पीस’ हा संदेश देण्यात येणार असल्याचे आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी, कुलकर्णी म्हणाले की ‘मुंबई कराची फ्रेंडशीप फोरम’च्या माध्यमातून भारत-पाक शांततेसाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येणार आहेत. या स्मृतिसभेत उपस्थितांनी १४ आणि १५ आॅगस्ट रोजी भारत-पाक शांततेसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा घेतली. भारत पाक शांततेसाठी केवळ राज्यकर्ते आणि प्रशासनावर अवंलबून राहणे योग्य नाही. त्यासाठी दोन्ही बाजूंच्या लोकांचा संवाद वाढला पाहिजे.
मॅगसेसे पुरस्कार विजेते, ज्येष्ठ मानवतावादी कार्यकर्ते अब्दुल सत्तार इधी यांची स्मृतिसभा आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन येथे सोमवारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कुलकर्णी बोलत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Gandhi-iTi campaign will be launched - Sudheendra Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.