गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 02:33 IST2016-09-10T02:33:42+5:302016-09-10T02:33:42+5:30

पाच दिवसांच्या बाप्पाला शुक्रवारी संध्याकाळी वाजत गाजत निरोप देण्यात आला.

Ganapati Bappa Morya next year ... | गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...


अलिबाग : पाच दिवसांच्या बाप्पाला शुक्रवारी संध्याकाळी वाजत गाजत निरोप देण्यात आला. त्यामध्ये एक सार्वजनिक आणि एक हजार २६० गणेशमूर्तींचा समावेश होता. जिल्ह्यातील ३० तलाव, १९ नदीचे पात्र, पाच समुद्र तर दोन ठिकाणच्या खाडी किनारी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी समुद्र किनाऱ्यासह नदी, तलाव या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तेथील स्थानिक प्रशासनाने गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी व्यवस्था केली होती. अलिबागमध्ये विविध मिरवणुका काढण्यात आल्या. पारंपरिक वाद्यांच्या आणि भजनांच्या तालावर गणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. खासगी गणेशमूर्तींना काहींनी आपापल्या वाहनांतूनच विसर्जन स्थळी नेले. बाप्पाला विसर्जनासाठी नेताना वाहने, हातगाड्यांची सजावट करण्यात आली होती. काहींनी भजने गात बाप्पाला निरोप दिला.
अलिबाग नगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांची साफसफाई केली होती. रस्त्यावर साठलेली धुळ काढल्याने रस्ते चकाचक झाल्याचे दिसत होते. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी विजेचीही सोय केल्याचे दिसून आले. विसर्जन शांततेमध्ये पार पडावे यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी ४०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, १०० होमगार्ड असा फौजफाटा जिल्ह्यात तैनात करण्यात आला होता. गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणातील चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला असल्याने महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (विशेष प्रतिनिधी)
>चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या जादा बसेस
गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणातील चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु झाल्याने महामार्गावर चोखी पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. गुरु वारी श्रीवर्धन आगारातून ७ तर मुरुड आगारातून एक अशा आठ जादा एसटी मुंबईसाठी रवाना झाल्या तर शुक्रवारी श्रीवर्धन व मुरुड आगारातून प्रत्येकी ७ अशा एकूण १४ एसटी मुंबईस रवाना झाल्या असल्याची माहिती एसटीच्या नियंत्रण कक्षाच्या सुत्रांनी दिली आहे.अलिबाग नगरपालिकेने गणेशोत्सव सुरु असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांची साफसफाई केली होती. यामुळे नागरिकांनी देखिल समाधान व्यक्त
के ले.त्याचप्रमाणे ठिकठिकाणी विजेचीही सोय केल्याचे दिसून आले. विसर्जन शांततेमध्ये पार पडावे यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ४०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, १०० होमगार्ड असा फौजफाटा जिल्ह्यात तैनात करण्यात आला होता.

Web Title: Ganapati Bappa Morya next year ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.