‘बीआरटी’मुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ

By Admin | Updated: November 30, 2014 00:40 IST2014-11-30T00:40:18+5:302014-11-30T00:40:18+5:30

‘बीआरटी’चा धरलेला हट्ट यामुळे ‘नगर रस्त्यावरील बीआरटी’ हा नागरिकांच्या जिवाशी खेळ असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

Games with the help of 'BRT' | ‘बीआरटी’मुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ

‘बीआरटी’मुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ

पुणो : भुयारी मार्गाच्या नियोजनाचा अभाव, रस्तारु ंदीकरण झालेले नसतानाही (बस रॅपीड ट्रान्सिट) ‘बीआरटी’चा धरलेला हट्ट यामुळे ‘नगर रस्त्यावरील बीआरटी’ हा नागरिकांच्या जिवाशी खेळ असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. 
 
संजय अगरवाल (व्यावसायिक)
मुख्य रस्त्याच्या मध्य भागापासून 5क् टक्के  रस्ता बीआरटीने व्यापलेला आहे. उर्वरित रस्ता हातगाडय़ांच्या अतिक्रमणाने संपवलेला आहे. अशा अवस्थेत बीआरटी सुरू झाल्यावर, किती फरक पडेल ? बीआरटी सेवा चांगली आहे; परंतु नियोजन मात्र चुकलेलेच दिसते. 
 
लक्ष्मण कांबळे ( हॉटेल व्यवस्थापक )
पर्णकुटी पोलीस चौकी ते गुंजन चौक हा भाग दाट गर्दीचा आहे. बीआरटीने ती गर्दी इतकी गिचमिडीची झालेली आहे की, मागील दोन वर्षात तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. अपु:या जागेत बीआरटी मार्ग उभा करून, सरकार नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. 
 
शमिम शेख (बॅँक अधिकारी)
मी काम करीत असलेली बँक, बीआरटीच्या रस्त्याला लागूनच आहे. मी अपंग आहे. बीआरटी मार्गाची बांधणी झाल्यानंतर, आता वापरत असलेल्या रस्त्याची रुंदी कमी झाली. मला बँकेर्पयत पोहोचता पोहोचता रोज हजारो यातना होतात. रस्तारुंदीकरण रेंगाळत ठेवून बीआरटी प्रकल्प चालू ठेवणो. यातून काहीही साध्य होणार नाही. मला अस वाटतं की, बीआरटीपेक्षा पूर्वीची परिस्थिती अतिशय चांगली होती. हा प्रकल्प फसलेला आहे. 
 
शांताराम नानगुडे (हॉटेल व्यावसायिक)
चंदननगरच्या केंद्रीय विद्यालयासमोरील चौकात भुयारी मार्गाचे नियोजन होते. तो भुयारी मार्ग पूव्रेच्या दिशेने 1क्क् फूट पुढे नेऊन बांधण्यात आला. केंद्रीय विद्यालयातील मुले आणि त्यांना न्यावयास येणारे पालक हे भुयारी मार्गाचा वापर न करता, ते रस्त्यावर गर्दी करतात. परिणामी अपघात होऊन मृत्युमुखी पडण्याच्या घटना देखील घडत आहेत. या चौकात एसटीचा थांबा असल्यामुळे, या गर्दीच्या प्रमाणात आणखीनच भर पडते व अपघातास अनुकूल वातावरण निर्माण होते. 
रामदास काळे (दुर्गा ट्रॅव्हल्स, चंदननगर)
बीआरटीची बांधणी स्त्रिया, लहान मुले व वयस्कर व्यक्ती यांच्यासाठी निरुपयोगी आहे. बीआरटीसाठी फक्त मध्यभाग राखून ठेवण्यात आलेला आहे. उर्वरित रस्त्यावर रांजणगावपासूनच्या वाहतुकीचा ताण येतो. त्यातून इतर वाहतूक पूर्णपणो कोलमडते. त्यापेक्षा बीआरटी रस्त्याच्या कडेला असणोच उत्तम. 
 
संजीव पवार (ऑटो व्यावसायिक)
रस्तारुंदीकरणानंतर वाहतुकीची समस्या पूर्णपणो मिटली होती. बीआरटी बांधून तो सुरळीतपणा संपविण्यात आला. बीआरटी बांधून सरकाने या भागातील नागरिकांची व आयटीक्षेत्रत कामाला येणा:या कर्मचा:यांची दयनीय अवस्था केल्यासारखी वाटते. 
 
कांकरिया पेट्रोलपंप, नगर रोड
या बीआरटीचा नकाशा कोणी, अािण कसा आखला, 
देवजाणो; पण पूर्णत: फसलेल्या या प्रकल्पामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. बीआरटीतून काहीच साध्य होणार नाही, हे आताच दिसून येते. 
 
जियाफभाई अन्सारी (रिक्षाचालक)
निव्वळ मूर्खपणा आहे. मुले, स्त्रिया आणि वयोवृद्ध यांच्यासाठी हा प्रकल्प काहीच उपयोगाचा नाही. गर्दीच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची वेळ आली आहे. बीआरटीचा काळ केव्हाच संपलेला आहे. हा कालबाह्य झालेला प्रकल्प आहे. 
 
पंडित साळवे (विश्रंतवाडी)
रस्ता ओलांडण्याचे कुठलेच नियोजन या प्रकल्पात नसून ते विकसित करण्याची शक्यतादेखील संपलेली आहे. जिने चढून वर जाणो व रस्ता पार करणो प्रत्येकाला शक्य नाही. नागरिक रस्त्यावरच गर्दी करणार, त्यामुळे आतापेक्षा जास्त धोकादायक परिस्थिती बीआरटी सुरू झाल्यावर निर्माण होईल. 
अशोक इगवे (ज्येष्ठ नागरिक) 
मी, बीआरटीच्या रस्त्याच्या पलीकडे राहतो व शाळा रस्त्याच्या अलीकडच्या भागात आहे. माङया नातवास शाळेत ने-आण करताना मला रोज कोणाची तरी मदत घ्यावी लागते. बीआरटीतून उतरलेल्या नागरिकांनी कसा किनारा गाठायचा? संतोष वराळ त्या रस्त्यावरून घरी आल्यावर मृत्यूच्या सापळ्यातून सुखरूप घरी आल्यासारखे वाटते. वाहतूक सुधारणा करण्यासाठी असे भयानक प्रकल्प आणण्याची काय गरज होती. 
 
डॉ. शेटिया (कोमल नर्सिग होम, विश्रंतवाडी)
रस्त्याच्या मधोमध बीआरटी बांधून नागरिकांचे जीवन धोक्यात घालणारा प्रकल्प सरकारने नागरिकांना भेट दिलेला आहे. धनकवडी-स्वारगेट व हडपसर या भागात उड्डाणपुलाची तयारी सुरू झालेली आहे. इथेसुद्धा गरज आहे. बीआरटीचा काळ संपलेला आहे. 
 
धनराज सुरग
बीआरटीमुळे रस्ता ओलांडण्यासाठी कुठलीच सोय नाही. त्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. येरवडा व संगमवाडी येथे दोन थांबे कमी अंतरावर, समोरासमोर बांधण्यात आलेले आहेत. त्यातून भ्रष्टाचाराचा संशय होतो. कारण, एकाच ठिकाणी दोन थांब्यांची आवश्यकता होती का?
 
पावलस म्हंकाळे (नागरिक, विश्रंतवाडी)
जनतेच्या कररुपी पैशांतून हा प्रकल्प निर्माण होत आहे. अशावेळी त्या त्या भागातील नागरिकांना विचारविनिमयासाठी सुरुवातीपासूनच का सहभागी करून घेण्यात आले नाही? बीआरटी प्रचंड चुकीचा व फसलेला प्रकल्प आहे. विश्रंतवाडी परिसरामध्ये उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर स्वतंत्र भाजीपाला मंडई उभी करणो, पीएमटीचा स्वतंत्र डेपो उभा करणो रस्तेदुभाजक इ. आवश्यक गोष्टींची खरी गरज आहे; परंतु शासनाला हे कळतच नाही. 
 
4माहानगरपालिका लवकरच ‘विश्रंतवाडी ते खराडी’ हा बीआरटी मार्ग कार्यान्वित करणार आहे. या बीआरटीमार्गावर असंख्य समस्या, त्रुटी, अडचणी आहेत. त्याबाबत त्या भागातील नागरिकांशी  ‘लोकमत’ने संवाद साधला. या वेळी नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. नगर रस्त्यावर अगोदरच वाहतुकीचा मोठा ताण आहे. त्यातच रस्त्याचा अर्धा भाग हा बीआरटीने व्यापल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्यावर आयटी कंपन्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रामुख्याने कॅबमधून वाहतूक होते. त्यामुळे बीआरटीचा उपयोग होणार नसल्याचे नागरिकांचे म्हणणो आहे. 
 

 

Web Title: Games with the help of 'BRT'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.