मोबाईलमधील गेम डिलीट केला, म्हणून मित्राचा केला खून
By Admin | Updated: December 24, 2014 12:31 IST2014-12-24T12:28:58+5:302014-12-24T12:31:04+5:30
मित्राने मोबाईलमधील गेम उडवला म्हणून अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राचीच चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना साता-यात घडली आहे.

मोबाईलमधील गेम डिलीट केला, म्हणून मित्राचा केला खून
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. २४ - मित्राने मोबाईलमधील गेम उडवला म्हणून रागवलेल्या अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राचीच चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साता-यातील पाटणा तालुक्यात हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. अल्पवयीन आरोपी व त्याचा मित्र विशाल भिसे हे दोघे जत्रेहून परत येत असताना विशालने आरोपीच्या मोबाईलमधील गेम डिलीट केला. त्यावरून त्या दोघांत भांडणही झाले. त्यामुळे रागावलेल्या आरोपीने विशालच्या शरीरात चाकू भोसकला. त्याला उपाचारांसाठी तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी पोलिसांनी अलपवयीन आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.