शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

'गजा मारणेचंही असंच स्वागत झालं होतं', संजय राऊतांच्या स्वागतावर मुनगंटीवाराचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 20:28 IST

शिवसेनेच्यावतीनं मुंबई विमानतळावर आज शिवसेना खासदार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

मुंबई-

शिवसेनेच्यावतीनं मुंबई विमानतळावर आज शिवसेना खासदार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत संजय राऊत यांचं शिवसैनिकांनी स्वागत केलं. शिवसेनेकडून यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात आलं. तसंच शिवसैनिकांकडून भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. पुण्यात गुंड गजा मारणेचंही असंच स्वागत झालं होतं, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे. 

"पुण्यात गजानन मारणे नावाचा गुंड होता, तो सुटल्यानंतरही त्याचं स्वागत झालं. मग तो आदर्श पुरूष आहे का? प्रत्येकाने कुटुंबातील सदस्याला सांगायचं तू गजानन मारणेच हो, हे सांगण्यासारखं आहे का?", अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांच्या स्वागतावर केली आहे.

मुंबईत राऊतांचं जोरदार स्वागतईडीनं संजय राऊत यांच्याशी निगडीत अलिबाग येथील जमीन आणि दादर येथील फ्लॅट जप्त केला. त्यानंतर संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचं आयएनएल विक्रांत संबंधिचं प्रकरण उघडकीस आणलं आणि सोमय्या यांनी ५८ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला. त्यानंतर राऊत यांचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत करण्याची तयारी शिवसेनेच्यावतीनं करण्यात आली होती. 

ढोल-ताशांच्या गजरात संजय राऊत यांचं मुंबई विमानतळावर स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते. संजय राऊत यांनी मुंबईत दाखल होताच किरीट सोमय्यांवर शरसंधान केलं. सोमय्यांनी आरोपांवर उत्तर दिलं नाही हाच त्यांनी केलेल्या घोटाळ्याचा पुरावा आहे, असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊत