शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

गडकरींच्या विकास पॅटर्नला नानांचे आव्हान; आमदारांचीही शक्तिपरीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 01:23 IST

विदर्भाचे पॉलिटिकल सेंटर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय व भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिंगणात असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

- कमलेश वानखेडे

नागपूर : विदर्भाचे पॉलिटिकल सेंटर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय व भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिंगणात असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. यावेळी गडकरींच्या विकास पॅटर्नलाच आव्हान देत काँग्रेसकडून माजी खासदार नाना पटोले रिंगणात उतरले आहेत. रिंगणात इतर पक्ष व उमेदवार असले तरी थेट लढत या दोन प्रमुख नेत्यांमध्येच होण्याची चिन्हे आहेत.काँग्रेसचा गड मानला जाणारा नागपूर मतदारसंघ २०१४ मध्ये गडकरींनी पावणेतीन लाखाहून अधिक मतांनी भेदला होता. गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा घेऊन गडकरी यावेळी पुन्हा मैदानात उतरले आहेत. नाना पटोले यांची भिस्त सामाजिक समीकरणांवर आहे. नागपुरात फारसे अस्तित्व नसलेली शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष प्रचाराचे सोपस्कार पार पाडण्यात व्यस्त आहेत.भंडारा-गोंदियातून थेट नागपुरात एन्ट्री घेतलेल्या पटोलेंसाठी नागपूरची रणभूमी तशी नवी आहे. त्यांची भिस्त पूर्णपणे काँग्रेस कार्यकर्त्यांवर आहे. पक्षसंघटनेच्या बळावर भाजपाची शहरात पकड घट्ट आहे तर गटबाजीला त्रासलेला काँग्रेस कार्यकर्ताही नवा पर्याय मिळाल्याने कामाला लागला आहे. आजवर ‘वाड्या‘भोवती फिरणारे काँग्रेस नेते किती निष्ठेने पटोलेंसाठी राबतात यावर बरेच काही ंअवलंबून आहे.नागपूर लोकसभेंतर्गत येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघात गडकरी यांनी आघाडी घेतली होती. या वेळीही आपले मतदारसंघ शाबूत राखण्यासाठी भाजपाचे आमदार कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील स्वत: लक्ष ठेवून आहेत. विधानसभेत काँग्रेसकडून पराभूत झालेले व यावेळी पुन्हा इच्छुक असलेले उमेदवार आपापल्या मतदारसंघाची ट्रायल घेण्यासाठी सज्ज आहेत. बसपाने यावेळी आपले नगरसेवक मोहम्मद जमाल यांना संधी दिली आहे. बसपाला खिंडार पाडत ‘बीआरएसपी’ हा नवा पक्ष स्थापन करणारे अ‍ॅड. सुरेश माने रिंगणात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीने प्रदेश सरचिटणीस सागर डबरासे यांच्यावर डाव लावला आहे. या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना रिपब्लिकन मते खेचली तर काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो.कळीचे मुद्देमेट्रो रेल्वे, मिहान, सिमेंट रोड यासारख्या विकासाच्या मुद्यांवर नितीन गडकरी नागपूरकरांना साद घालत आहेत.तर पटोले हे नागपूरचा नव्हे तर भाजपाच्या नेत्यांचा विकास झाला, असा दावा करीत भाजपा नेत्यांना लक्ष्य करीत आहेत.आपण रेकॉर्ड टार्इंममध्ये मेट्रो सुरू केली. आयआयएम, एम्स आणले. मिहानचा विकास झाला. लॉ युनीवर्सिटी आली. नागपूर खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट रोडचे जाळे उभारले. ही फक्त पाच वर्षातील प्रगती आहे. यापूर्वीची १५ वर्षे काँग्रेसचे खासदार होते. त्यांनी काय केले हे जनतेला ठाऊक आहे.- नितीन गडकरी, भाजपामेट्रो रेल्वे, सिमेंट रोड हे विकासाचे मापक आहेत का ? मिहानमध्ये किती युवकांना रोजगार मिळाला ? मेडिकल, मेयोची काय दुर्दशा झाली आहे. डॉक्टर नाही, औषध नाही, मशीन बंद आहेत. स्वच्छतेत नागपूर शहर ५२ व्या क्रमांकावरून ५८ व्या क्रमांकावर का घसरले, यावर सत्ताधाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे.- नाना पटोले, काँग्रेस

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक