गडचिरोलीच्या निधी सेताची उत्तुंग भरारी

By Admin | Updated: June 23, 2014 01:11 IST2014-06-23T01:11:59+5:302014-06-23T01:11:59+5:30

‘मला नेहमीच्या चाकोरीपलीकडे काहीतरी वेगळे करायला आवडते. मी गडचिरोलीतून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण पॉवर प्लॅन्ट विद्या शाखेतून घेतले.

Gadchiroli's fund raising funds | गडचिरोलीच्या निधी सेताची उत्तुंग भरारी

गडचिरोलीच्या निधी सेताची उत्तुंग भरारी

हवाई दलात अधिकारी बनणार : संरक्षण दलात जिल्ह्याला प्रथमच मान
गडचिरोली : ‘मला नेहमीच्या चाकोरीपलीकडे काहीतरी वेगळे करायला आवडते. मी गडचिरोलीतून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण पॉवर प्लॅन्ट विद्या शाखेतून घेतले. ज्या क्षेत्रात मला काहीतरी ठोस करून दाखविता येईल, माझ्या गुजराती कुटुंबातील तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आजवर कुणीही संरक्षण दलात रूजू झाले नाही. हवाई दलात एरॉनॉटिकल इंजिनीअर म्हणून दाखल होताना मला प्रचंड औत्सुक्य आणि सार्थ अभिमानही आहे.’ हे उद्गार आहेत, मागास गडचिरोलीच्या निधी सेता या २३ वर्षीय युवतीचे!
हवाई दलाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी हवाई दलाच्या तांत्रिक शाखेच्या एरॉनॉटिकल इंजिनीअर (मेकॅनिकल) च्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनचा निकाल जाहीर झाला. या पदासाठी देशभरातून निवडल्या गेलेल्या तीन महिलांमध्ये गडचिरोलीच्या निधी सेता या युवतीने मानाचे स्थान मिळविले आहे.
हैदराबाद, डुंडीगल येथील एअर फोर्स अ‍ॅकॅडमीत निधी सेता ही ५ जुलै रोजी रूजू होणार आहे. हवाई दलात अधिकारी बनण्यासाठी युवा वर्गाला हवाई दलाची सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. यासाठी निधी सेता हिने आॅगस्ट २०१३ मध्ये अर्ज सादर केला. तीने लेखी परीक्षा म्हैसूर येथे दिली. त्यानंतर ए.एफ.एस.बी. मुलाखत आणि त्यानंतर ती वैद्यकीय परीक्षेतही उत्तीर्ण झाली आहे. एरॉनॉटिकल इंजिनीअरिंगच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी देशभरातून १२ पुरूष आणि तीन महिलांची निवड झाली आहे. हैदराबाद येथे रूजू झाल्यानंतर त्यांना लगेचच फ्लाइंग आॅफिसर ही रँक मिळेल आणि ७ जुलैपासून हैदराबाद येथे सहा महिन्यांचे प्रशिक्षण आणि बेंगलुरू येथे दीड वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करणार असल्याचे निधी सेता हिने लोकमतला सांगितले.
निधी सेता ही सध्या येथील पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करते. जिल्ह्यातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व अभियांत्रिक क्षेत्रामध्ये करिअर घडविले आहे.
जिल्ह्याच्या युवतींनी नेहमीच्या क्षेत्राशिवाय आव्हानात्मक क्षेत्रात करिअर घडवावे, असेही निधी सेता हिने सांगितले. माझ्या यशाने गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्याचा मान वाढला असून त्याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही निधी सेता हिने सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Gadchiroli's fund raising funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.