शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गडचिरोलीचे हत्ती सुदृढ, त्यांना गुजरातला नेताच कसे?; दोन कायदेतज्ज्ञांची केंद्रीय मंत्रालयाला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 10:38 AM

प्रसंगी हायकोर्टात जाणार

पुणे :   गडचिरोली  जिल्ह्यातील हत्ती गुजरात येथील रिलायन्स कंपनीच्या खासगी प्राणी रेस्क्यू सेंटर येथे पाठविण्यात येत आहेत. या हत्तीचे स्थलांतर प्राणी हक्काविरोधात असून, स्थानिकांना निर्माण होणाऱ्या उपजीविकेवरसुद्धा गदा आणणारे आहे, असे सांगत ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे व गडचिरोलीतील ॲड. बोधी रामटेके यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. सात दिवसांत समाधानकारक उत्तर न आल्यास व स्थलांतर थांबविण्यासाठी  कुठलीही हालचाल न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असे या नोटिसीमध्ये म्हटले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेला कमलापूर वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्प हा महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प आहे. विविध कायद्यात, नियमावलीत शासकीय हत्ती कॅम्प संदर्भातील नियम दिले आहेत. प्रत्येक कॅम्पमध्ये महावत, प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी असणे आवश्यक आहे. परंतु, यावर भर न देता, रिक्त असलेली पदे न भरता स्थलांतर करणे चुकीचे आहे. अनेक वर्षांपासून कामलापूर, पतानील या ठिकाणी हत्तीचे वास्तव्य आहे.  ते जिल्ह्यातील असे एकमेव पर्यटनस्थळ असल्यामुळे आर्थिक स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीनेसुद्धा ते महत्त्वाचे आहे. म्हणून संपूर्ण जिल्ह्यातून या हत्तीच्या स्थलांतराविरोधात मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेत भाग घेतलेल्या लोकांमार्फत ही कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. प्राण्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानातील अनुच्छेद २१ नुसार प्राण्यांनासुद्धा चांगले आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. या अधिकारांचे उल्लंघन रोखण्यासाठी आम्ही हे स्थलांतर रद्द करून त्याठिकाणी रिक्त पदे भरावीत, अशी मागणी केली आहे.- ॲड. बोधी रामटेकेरेस्क्यू सेंटर किंवा संग्रहालयात अशा प्राण्यांना पाठविण्यात येते, जे जंगलात अनाथ सापडलेले आहेत किंवा विकलांग आहेत. कमलापूर येथील हत्ती पूर्णपणे सुदृढ आहेत. सुदृढ प्राण्यांना जंगलातून बंदिस्त, बनावट अशा ठिकाणी घेऊन जाणे हा प्राण्यांचा छळ आहे.- असीम सरोदे, ज्येष्ठ विधिज्ञ