शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी चकमक; १ जवान शहीद तर दोन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 11:33 IST

गडचिरोलीतील ग्यारपत्ती भागात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे.

गडचिरोली- गडचिरोलीतील ग्यारपत्ती भागात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. तर दोन जवान जखमी झाले आहेत.  शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास कोरची तालुक्यातील कोटगूल येथे घडविलेल्या बॉम्बस्फोटात एक पोलीस जवान शहीद तर दोन गंभीर जखमी झाले होते. सततच्या या नक्षली हिंसाचारामुळे नक्षलविरोधी मोहिमेला जबर हादरा बसला आहे.

रविवारी सायंकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकावर हल्ला चढविला. यात एक जवान शहीद, तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ग्यारपत्ती पोलीस मदत केंद्रांतर्गत टवे येथील जंगलात घडली. मंजुनाथ असे शहीद जवानाचे नाव असून, तो कर्नाटक राज्यातील रहिवासी आहे. या घटनेत लोकेशकुमार व दीपक शर्मा (दोघेही उत्तरप्रदेश) हे जवान गंभीर जखमी झाले आहेत. 

२४ नोव्हेंबरला नक्षल्यांनी कोटगूल येथे केलेल्या भूसुरुंगस्फोटात हवालदार सुरेश गावडे हे शहीद झाले, तर सोनल खेवले व विकास धात्रक हे जवान जखमी झाले. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी नक्षलविरोधी अभियानाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डी.कनकरत्नम व पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्या भागात नक्षली कारवाया वाढल्यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक नक्षलशोध अभियानावर पाठविण्यात आली. रविवारी संध्याकाळी ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्रातील केंद्रीय राखीव दलाच्या जवानांची एक तुकडी टवे येथील जंगलात गेली होती. ही तुकडी त्या भागात मुक्कामी होती. एवढयात सशस्त्र नक्षल्यांनी या तुकडीवर हल्ला चढविला. सुरूवातीला नक्षलवादी पोलिसांचा दबाव पाहून पळून गेल्याचे सांगण्यात आले. मात्र नक्षलवादीच पोलिसांवर वरचढ झाले आणि या तुंबळ चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अभियानावर गेलेली ही तुकडी अद्यापही आपल्या आश्रयस्थळी परत आली नसली तरी त्यांच्या संपर्कात असल्याचे नक्षलविरोधी अभियानाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. गेल्या आठवडाभरात नक्षल्यांनी धानोरा तालुक्यात ३ नागरिकांची हत्या केली, तर २ जवानांना शहीद व्हावे लागले. या घटनेमुळे पोलीस दलाला मोठा हादरा बसला आहे. हे जवान सीआरपीएफच्या 113 बटालियनचे आहेत.

संबंधित बातमी : नक्षलवाद्यांच्या बंदुकीने ४९०हून अधिक आदिवासींचा घेतला बळी

टॅग्स :naxaliteनक्षलवादी