नक्षलवाद्यांच्या बंदुकीने ४९०हून अधिक आदिवासींचा घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:00 AM2017-11-24T00:00:05+5:302017-11-24T00:00:35+5:30

मागील चार दिवसात नक्षलवाद्यांनी निष्पाप आदिवासींवर केलेल्या हल्ल्यात तिघांचा बळी घेतला तर जैनी परसा ही महिला थोडक्यात बचावली.

More than 490 tribal victims of Naxalism shot dead | नक्षलवाद्यांच्या बंदुकीने ४९०हून अधिक आदिवासींचा घेतला बळी

नक्षलवाद्यांच्या बंदुकीने ४९०हून अधिक आदिवासींचा घेतला बळी

Next

मागील चार दिवसात नक्षलवाद्यांनी निष्पाप आदिवासींवर केलेल्या हल्ल्यात तिघांचा बळी घेतला तर जैनी परसा ही महिला थोडक्यात बचावली. मरणारी ही माणसे नक्षल्यांचा उघडपणे विरोध करणारी होती. ३७ वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात शिरकाव केलेल्या नक्षलवादाचा खरा चेहरा कळून चुकल्याने त्यांना कोणतीही मदत न करण्याचा निर्णय या आदिवासींच्या जीवावर उठला. आजतागायत ४९० हून अधिक आदिवासी नक्षलवाद्यांच्या बंदुकीने मारले गेले. यातील काही प्रकरणात तर हे कृत्य अनवधानाने झाल्याचे मान्य करीत नक्षली या आदिवासींची माफीही मागायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. विकासाची जी स्वप्नं नक्षल्यांनी आजवर आदिवासींना दाखविली मुळात तीच त्यांच्या विकासात बाधक असल्याची जाणीव झाल्याने आदिवासी आता नक्षल विरोधी भूमिका घेऊ लागले आहेत. खरं तर ही नक्षलवाद विरुद्ध आदिवासी अशा संघर्षाची सुरुवात असून नक्षलवाद्यांसाठी ही आत्मविनाशक वाटचाल आहे. नक्षलवाद्यांचे स्मारक उद्ध्वस्त करताना नागरिकांना आता भीती वाटत नाही. उलट नक्षल हल्ल्यात मरणाºया नागरिकांचे स्मारक बांधण्याचे धाडस त्यांच्यात आले आहे. पोलिसांसाठी ही जमेची बाजू आहे. पोलीस आणि आदिवासींमधील दरी गडचिरोलीचे तत्कालीन पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी भरून काढण्याचे मोठे कार्य या जिल्ह्यात केले आहे. खचलेल्या पोलीस दलात नवचैतन्य निर्माण करण्याची किमया आबांनी करून दाखविली.पोलीस तुमचे शत्रू नसून मित्र आहेत, हेदेखील आबांनी आदिवासींंना पटवून दिले. तेथूनच नक्षलवादाला लागलेली ओहोटी आजही कायम आहे. जमिनीत पेरलेल्या भूसुरूंगाची माहिती वेळेवर मिळू लागली. नक्षल्यांना गावातून मिळणाºया मदतीचे प्रमाण अत्यंत कमी झाले आणि याच मुळे नक्षलवाद्यांनी आता नागरिकांना टार्गेट करणे सुरू केले आहे. पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नातून असले भ्याड हल्ले होत आहेत. पूर्वी पोलिसांचा खब-या असा ठपका ठेवत एखाद्याला भरचौकात मारणारे नक्षली आता अपहरण करून एकांतवासात त्याची हत्या करतात तेव्हा नागरिकांचीही भीती त्यांना असल्याचे स्पष्ट होते. शासकीय आकड्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्याची संख्या फक्त २२० च्या घरात आहे. अर्थात आपण उघडपणे नागरिकांचादेखील सामना करू शकत नाही, ही बाब नक्षल्यांना कळून चुकली आहे. नागरिकांनी नक्षलवादाचा बीमोड करण्याचा संकल्प घेतला आहे, त्याला गरज आहे ती पोलिसांच्या सहकार्याची.

Web Title: More than 490 tribal victims of Naxalism shot dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.