गडचिरोली - देसाईगंजचे कारले दुबईत
By Admin | Updated: September 5, 2016 13:58 IST2016-09-05T13:58:11+5:302016-09-05T13:58:52+5:30
देसाईगंज तालुक्यातील शेतकरी आता नगदी पिकाकडे वळला असून तालुक्याच्या ठिकाणी दररोज परिसरातील शेकडो क्विंटल माल बाजारपेठेत येत आहे

गडचिरोली - देसाईगंजचे कारले दुबईत
>- ऑनलाइन लोकमत
देसाईगंज (गडचिरोली), दि. 5 - देसाईगंज तालुक्यातील शेतकरी आता नगदी पिकाकडे वळला असून तालुक्याच्या ठिकाणी दररोज परिसरातील शेकडो क्विंटल माल बाजारपेठेत येत आहे. तो नागपूर मार्गे सरळ दुबई येथे रवाना होत असल्याची माहिती ठोक व्यापारी रमेश चु-हे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
सध्या देसाईगंज तालुका भाजीपाला उत्पादनात आघाडीवर असून कोबी हे पीक वगळता इतर सर्व भाजीपाला परिसरातच उत्पादीत होत असल्याने रोज सकाळी ठोक माल विक्रीसाठी परिसरातील शेतकरी सकाळीच बाजारपेठेत दाखल होत आहे. त्यादृष्टीने सर्वात फायदेशीर पीक म्हणून कारले पिकाकडे बघितले जाते. रबी व खरीप या दोन्ही हंगात कारल्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. दररोज शेकडो क्विंटल कारले बाजारपेठेत असून इतर भाजीपाल्यापेक्षा कारल्याला अधिक भाग मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. आलेला माल ठोक व्यापाला विकून तो २० किलो ग्रॅमच्या बॅगमध्ये पॅक करून ट्रकच्या माध्यमातून नागपूर मार्गे दुबईच्या शारजा येथे पाठविला जात आहे, अशी माहिती चुºहे यांनी दिली.
नागपूरच्या बाजारपेठेत देसाईगंजच्या कारल्यांना मोठी मागणी असून अतिशय चवदार व स्वादीष्ट कारले म्हणून देसाईगंजचे कारले प्रसिध्द आहेत.