शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 

By संजय तिपाले | Updated: April 4, 2026 12:47 IST

Gadchiroli Crime News: प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरुणास हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर ब्लॅकमेल करुन पैसे उकळले. चार लाख दिल्यावरही भूक थांबली नाही, १५ लाखांसाठी त्याला  थेट विष पाजून संपविण्याचा प्रयत्न केला.

गडचिरोली - प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरुणास हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर ब्लॅकमेल करुन पैसे उकळले. चार लाख दिल्यावरही भूक थांबली नाही, १५ लाखांसाठी त्याला  थेट विष पाजून संपविण्याचा प्रयत्न केला. एखाद्या चित्रपटाला शोभेल, अशी ही थरारक घटना आरमोरी येथे ३ एप्रिल रोजी उघडकीस आली.  याप्रकरणी तरुणीसह तिच्या दोन साथीदारांवर आरमोरी ठाण्यात खंडणी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.  

 पोलिसांच्या माहितीनुसार, आरमोरी येथील एका २६ वर्षीय तरुणाचे एका २३ वर्षीय तरुणीसोबत सूत जुळले होते. मात्र, तिच्या आयुष्यात नव्या प्रियकराची एंट्री झाल्याने  त्यांच्यात खटके उडू लागले. याच संधीची वाट पाहत असलेल्या दोन तरुणांनी मध्यस्थीचा आव आणला.  तुझे चॅटिंग आमच्याकडे आहे, ते व्हायरल करून तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करू,  अशी धमकी देत या त्रिकुटाने संबंधित तरुणाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. बदनामीच्या भीतीने तरुणाने वेळोवेळी त्यांना सुमारे ३ ते ४ लाख रुपये दिले.....​१५ लाखांची मागणी, मारहाण करुन पाजले विष​आरोपींची पैशांची भूक एवढ्यावरही शमली नाही. त्यांनी पीडित तरुणाकडे थेट १५ लाख रुपयांची मागणी केली. पैशांची तरतूद न केल्यास तू मरुन जा, नाही तर आम्ही तुला मारु, अशी टोकाची धमकीही दिली.१३ मार्च २०२६ रोजी संबंधित तरुण ब्रह्मपुरी रोडने जात असताना आरोपींनी त्याला वाटेतच गाठले. तिथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि चक्क बळजबरीने त्याच्या तोंडात शेतीचे कीटकनाशक ओतले. तरुण निपचित पडल्यावर आरोपींनी तिथून पळ काढला.....

​नागपुरात मृत्यूशी झुंज अन् धक्कादायक खुलासा​विषप्राशन केल्याने पीडित तरुणाची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्याला तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस शुद्ध हरपलेला हा तरुण शुद्धीवर येताच ३ एप्रिलला त्याने आपबिती सांगितली, त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. विशेष म्हणजे तरुणास विष पाजल्यानंतर त्याच्या मोबाइलवरुन वडिलांना बाबा, मला माफ करा, असा मेसेज धाडला व विषाच्या बाटलीचा फोटो श्रेया हेमके हिच्या मोबाइलवर पाठविला होता, यावरुन प्रेमप्रकरणातून त्याने स्वत: विष घेतल्याचे भासविण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. ....​यांच्यावर झाला गुन्हा दाखल​तक्रारीनुसार आरमोरी पोलिसांनी श्रेया हेमके, नितीन जोध, राजू अंबानी  (सर्व रा. आरमोरी) यांच्याविरुद्ध   गुन्हा नोंदवला आहे. या टोळीने आणखी कोणा तरुणांना अशाप्रकारे जाळ्यात ओढले आहे का? याचा तपास आता पोलिस करत आहेत. आरोपींचा शोध सुरु असल्याचे पो.नि. कैलास गवते यांनी सांगितले.....

English
हिंदी सारांश
Web Title : Honey trap, blackmail, poisoning: Woman and accomplices booked in Armori.

Web Summary : In Armori, a youth was honey-trapped, blackmailed for money, and poisoned after he failed to pay ₹1.5 million. A woman and two others are booked.
टॅग्स :honeytrapहनीट्रॅपCrime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली