गडचिरोलीत पावसाची संततधार कायम, १०० गावांचा संपर्क तुटला
By Admin | Updated: September 6, 2014 13:54 IST2014-09-06T13:52:39+5:302014-09-06T13:54:27+5:30
गडचिरोली जिल्ह्यात पावसाची संततधार अद्याप सुरू असून भामरागड तालुक्यातील तब्बल १०० गावांशी संपर्क तुटला आहे.

गडचिरोलीत पावसाची संततधार कायम, १०० गावांचा संपर्क तुटला
ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. ६ - गडचिरोली जिल्ह्यात पावसाची संततधार अद्याप सुरूच आहे. तर जोरदार पावसामुळे भामरागड तालुक्यातील तब्बल १०० गावांशी संपर्क तुटला आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने गावं जलमय झाली असून अनेक गावातील घरेही बुडाली आहेत. त्यातच इतर गावांशी संपर्क तुटल्याने मदतकार्यातही अडथळा येत आहे. पावसामुळे गावक-यांचे मोठे हाल होत आहेत.