गडचिरोलीत जहाल नक्षलवाद्यास अटक

By Admin | Updated: February 14, 2015 03:52 IST2015-02-14T03:52:10+5:302015-02-14T03:52:10+5:30

त्तर गडचिरोलीत डीव्हीसी सदस्य म्हणून कार्यरत असलेला जहाल नक्षलवादी शिवाजी उर्फ मैनू आयवा पोसुडी (२८) व प्लाटून सदस्य सविता

Gadchiroli arrested the Maoist naxalites | गडचिरोलीत जहाल नक्षलवाद्यास अटक

गडचिरोलीत जहाल नक्षलवाद्यास अटक

गडचिरोली : उत्तर गडचिरोलीत डीव्हीसी सदस्य म्हणून कार्यरत असलेला जहाल नक्षलवादी शिवाजी उर्फ मैनू आयवा पोसुडी (२८) व प्लाटून सदस्य सविता उर्फ अस्मिता बाजू तुमरेटी (१९) हिला पोलिसांनी मंगळवारी एटापल्ली तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील ताडबैली जंगल परिसरात अटक केली आहे. विशेष म्हणजे सात वर्षांनंतर प्रथमच डीव्हीसी सदस्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिवाजी हा अस्मितासोबत कुटुंबाला भेटण्यासाठी तोडगट्टा येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला तोडगट्टापासून जवळच असलेल्या ताडबैली जंगल परिसरात अटक केली. यापूर्वी २००६ मध्ये याच डिव्हीजनचा सदस्य मडावी याला अटक केली होती. शिवाजीला अटक झाल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. शिवाजी हा अत्यंत जहाल नक्षलवादी म्हणून ओळखला जातो.
शिवाजी पोसुडी हा प्लाटून क्रमांक ३ चा कमांडर व उत्तर गडचिरोली डिव्हिजन सदस्य म्हणून कार्यरत होता. नोव्हेंबर २००४ मध्ये तो गट्टा दलममध्ये भरती झाला. नोव्हेंबर २००८ पर्यंत त्याच ठिकाणी तो कार्यरत होता. त्यानंतर प्लाटून क्रमांक १४ मध्ये त्याची बदली झाली. फेब्रुवारी २०१० पर्यंत तो तेथेच कार्यरत होता. आॅगस्ट २०१० मध्ये प्लाटून क्रमांक ३ चा कमांडर म्हणून व डिसेंबर २०१३ मध्ये डीव्हीसी सदस्य म्हणून त्याला तेथेच पदोन्नती देण्यात आली. तेव्हापासून तो त्याच ठिकाणी कार्यरत होता.
२०१३ मधील पेंदूलवाही, हिदूर, २०१२ मधील गडदापल्ली, कोटमी, येर्रागड्डा, २००५ मधील कुंजेमरका, २००८ मधील सिरकोंडा, कोरेपल्ली, येडमपायली, रसपल्ली, २०१० मधील दोबोगुडा, कोंदावाही येथील चकमकीमध्ये त्याचा समावेश होता. त्याचबरोबर परपनगुडा येथील पुसु झुरू हेडो, कारका येथील पित्रू हेडो, कचलेर येथील पोलीस पाटील यांच्या खूनामध्येही त्याचा सहभाग आहे. रसपल्ली, दोडगिरी येथील वन विभागाच्या ट्रॅक्टरची जाळपोळ, मानेवारा, कमलापूर, नांगेवाही, कोटमी, जवेली, हालेवारा या नक्षल्यांमध्येही त्याचा समावेश आहे. शिवाजीवर १६ लाखांचे बक्षीस होते़
सविता तुमरेटी ही सुद्धा जहाल नक्षलवादी असून, जानेवारी २०११ मध्ये कसनसूर एलओएस सदस्य म्हणून ती भरती झाली. जून २०१४ पर्यंत ती याच दलममध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्यावर ४ लाख रूपयांचे बक्षीस होते. हिदूर, पेंदुलवाही, ताडगुडा, गर्दापल्ली येथील चकमक, जारावंडी ग्रामपंचायतीची जाळपोळ, मानेवारा येथील लालसू कुमोटी याच्या खून प्रकरणात तिचा समावेश असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Gadchiroli arrested the Maoist naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.