भावी अधिका:यांचा उद्या रंगणार गौरव सोहळा
By Admin | Updated: August 16, 2014 23:12 IST2014-08-16T23:12:12+5:302014-08-16T23:12:12+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) 2क्13 मध्ये झालेल्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या देशभरातील गुणवंतांचा गौरव सोहळा उद्या (सोमवार दि. 18) रंगणार आहे.

भावी अधिका:यांचा उद्या रंगणार गौरव सोहळा
>पुणो : देशाच्या विकासाचा आत्मा असलेल्या भारतीय प्रशासन सेवेत दाखल होण्याचे स्वप्न बाळगून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) 2क्13 मध्ये झालेल्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या देशभरातील गुणवंतांचा गौरव सोहळा उद्या (सोमवार दि. 18) रंगणार आहे. गणोश कला क्रीडा मंच येथे सकाळी 9 ते 1 या वेळेत होणा:या या सोहळ्य़ाला देशातील विविध भागातील 15क् भावी अधिकारी उपस्थित राहणार आहे. माईर्स एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट व लोकमत यांच्यावतीने हा देशातील एकमेव आगळावेगळा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यशवंतांच्या सत्कार समारंभासाठी देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी, माजी महासंचालक शैलजाकांत मिश्र, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, इंडियन र्मचट्स चेंबर्सचे अध्यक्ष प्रबोध ठक्कर, माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, लोकमत मीडिया प्रा. लि.चे संपादकीय व सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा व माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे अधिष्ठाता प्रा. राहुल कराड हे उपस्थित राहणार आहेत.
यूपीएससीच्या 2013 च्या परीक्षेत भारतात प्रथम आलेला गौरव अगरवाल, द्वितीय मुनीश शर्मा आणि तृतीय रचित राज यांचाही या वेळी सत्कार होणार आहे. आपल्या यशाचे रहस्य ते या वेळी उलगडतील. भारतीय राजकारणात अधिकाधिक प्रशिक्षित तरुणांनी सहभागी व्हावे, यासोबतच भारतीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नीतिमान, चारित्र्यवान व राष्ट्रप्रेमाची सामाजिक जाणीव असणारे प्रशासक निर्माण व्हावेत, यासाठी माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय पातळीवर यूपीएससीतील यशवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भारतामध्ये राष्ट्रीय पातळीवर आयोजित केला जाणारा हा अभूतपूर्व सत्कार सोहळा आहे. यूपीएससीमार्फत आएएस, आयपीएस, आयआरएस, आयएफएस मध्ये निवड झालेल्या विद्याथ्र्याना प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी एकत्र आणून त्यांच्यातील संवाद निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य या कार्यक्रमातून पार पाडले जाते. तसेच, यूपीएससी परीक्षार्थीना यशस्वीतांचे मोलाचे मार्गदर्शनही लाभते. सोमवारी रंगणा:या सोहळ्य़ातही देशात अव्वल ठरलेल्या पहिल्या तीन भावी अधिका:यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी परीक्षार्थी, तसेच प्रशासकीय सेवेत दाखल होऊ इच्छिणा:या तरुण पिढीला मिळणार आहे. गेल्या काही वर्षात भारतात जी आंदोलने झाली. त्यातून अनेक तरुणांमध्ये देशाविषयीची अस्मिता प्रखर झाली. प्रशासकीय सेवा हे देशसेवेचे उत्तम आणि प्रभावी माध्यम असल्याने अनेक तरुणांचा कल भारतीय प्रशासकीय सेवांकडे वाढला आहे. याकडे आता देशसेवेचे माध्यम म्हणून पाहिले जात आहे. यूपीएसीतून निवड झालेल्या गुणवंत उमेदवारांचा गौरव या सोहळय़ात केला जाणार आहे.(प्रतिनिधी)
प्रशासनाचा कणा असलेल्या भावी अधिका:यांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे. कारकिर्दीच्या सुरूवातीलाच होणारा गौरवसोहळा हा सामाजिक दायित्वाची भूमिका आणखी बळकट करणारा ठरेल.
- ऋषी दर्डा
संपादकीय व सहव्यवस्थापकीय संचालक लोकमत मीडिया प्रा. लि.
बलशाली भारताचे स्वप्न साकार होण्यासाठी नीतिमान आणि गतिमान प्रशासनाची जी आवश्यकता आहे, ती पूर्ण करण्यासाठी राष्ट्रप्रेमी युवकांनी राजकारणात व प्रशासनात सामील व्हावे.
- राहुल कराड
संस्थापक व अधिष्ठाता, एमआयटी स्कूल
ऑफ गव्हर्नमेंट.
4दिवसभर विविध उपक्रम व मार्गदर्शन सत्रंचे आयोजन.
4विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार मान्यवरांचा गौरव.
4महाराष्ट्रातील विद्याथ्र्याना मिळणार यशाचा कानमंत्र.
4देशभरातून यशस्वी कअर, कढर, कऋर आणि कफर उत्तीर्ण झालेले यशस्वी विद्यार्थी एकाच व्यासपीठावर येणार.
भावी अधिका:यांना मिळणार ज्येष्ठांचे मार्गदर्शन
प्रशासनामध्ये काम करताना अनेक प्रलोभने सामोरी येतात, त्यांना बळी न पडता देशापुढे चांगल्या कारभाराचा आदर्श ठेवावा, चांगले प्रशासन कसे असते, हे भावी अधिका:यांना समजावे यासाठी प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रशासकीय अधिका:यांचे मार्गदर्शनही त्यांना या कार्यक्रमात मिळणार आहे.