शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी लाईटच्या वापरावरून रत्नागिरीत मच्छीमारांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 18:15 IST

समुद्रात एलईडी लाईटद्वारे सुरू असलेल्या मोसमारीवरून मच्छीमारांमध्ये संघर्ष पेटला आहे . ही मासेमारी तत्काळ बंद करावी अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल.

रत्नागिरी - समुद्रात एलईडी लाईटद्वारे सुरू असलेल्या मोसमारीवरून मच्छीमारांमध्ये संघर्ष पेटला आहे . ही मासेमारी तत्काळ बंद करावी अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल. मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांना बाहेर फिरू देणार नाही असा इशारा हर्णै येथील मच्छीमारांनी सहायक मत्स्य आयुक्त रत्नागिरी यांना बुधवारी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त आ. बा. साळुंखे यांना रत्नागिरी येथे याबाबत निवेदन दिले.यावेळी एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे प्रतिनिधीही मत्स्य कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमल्याने संघर्ष उडण्याची शक्यता होती. मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच दोन्ही बाजूच्या मच्छीमार प्रतिनिधींनी संयमाची भूमिका घेतल्याने संघर्ष टळला.दोन्ही मच्छीमार गटांचे नेते , प्रतिनिधी, मच्छिमारी संस्थांचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेऊन दोन्ही मच्छीमार गटांना जगवण्याचे धोरण या सभेत ठरविले जाणार आहे, असे आमदार संजय कदम यांनी सांगितले. सागरी क्षेत्रात बारा नॉटिकल क्षेत्राबाहेर एलईडी मासेमारीला पूर्णतः बंदी आहे. मात्र राज्याच्या १२ नॉटीकल पर्यंतच्या जलधी क्षेत्रात एलईडी लाईटद्वारे मासेमारी करण्याबाबत शासनाची कोणतीही अधिसूचना नाही. या क्षेत्रात एलईडी लाईटचा वापर करावा की नाही याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निर्णय घेऊन तो राज्य शासनाला कळवायचा आहे , अशी माहिती रत्नागिरीचे सहायक मत्स्य आयुक्त आ. बा. साळुंखे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी