शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

शहीद किरण यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 05:21 IST

औरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र शहीद किरण पोपटराव थोरात यांचे पार्थिव गुरुवारी सायंकाळी लष्कराच्या विशेष विमानाने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र शहीद किरण पोपटराव थोरात यांचे पार्थिव गुरुवारी सायंकाळी लष्कराच्या विशेष विमानाने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. मूळ गावी फकिराबादवाडी (ता. वैजापूर) येथे शुक्रवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. यात युनिट-४ ‘एमएलआय’चे जवान किरण थोरात यांना वीरमरण आले. लष्कराचे नायब सुभेदार संजय पाटील, हवालदार पांडुरंग गोरे हे विशेष विमानाने त्यांचे पार्थिव घेऊन सायंकाळी विमानतळावर दाखल झाले. विमानतळाच्या इमारतीसमोरील चबुतऱ्यावर पार्थिव ठेवण्यात आले.>अखेरचा संवाद... माझ्या दोन्ही चिमुकल्यांची काळजी घ्याथोरात यांना वीरमरण आल्याचे कळताच फकिराबादवाडीसह तालुक्यावर शोककळा पसरली. शहीद थोरात यांचे घर शेतवस्तीवर असून तेथे त्यांचे आई वडील, भाऊ, पत्नी, पाच महिन्यांचा मुलगा श्लोक व मोठी मुलगी श्रेया राहते.