मुलाच्या वाढदिवशीच शहीदावर होणार अंत्यसंस्कार, केळगाव शोकसागरात
By Admin | Updated: June 23, 2017 22:58 IST2017-06-23T21:23:13+5:302017-06-23T22:58:30+5:30
जम्मू कश्मीरमध्ये पाकच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप सर्जेराव जाधव यांच्यावर शनिवारी केळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मुलाच्या वाढदिवशीच शहीदावर होणार अंत्यसंस्कार, केळगाव शोकसागरात
कुटुंबातील लोकांना धक्का बसेल म्हणून ही बातमी लपवली असली तरी रात्रभर ते हे दुःख लपवून एकांतात रडत बसले होते. संपूर्ण केळगाव व परिसरातील लोक या घटनेमुळे स्तब्ध झाले होते. शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत संदीपच्या कुटुंबाला ही बातमी कळू नये यासाठी गावकऱ्यांनी नियोजन केले होते. मिडियाच्या लोकांनाही शुक्रवारी सकाळी 10 पर्यंत बाहेरच थांबविण्यात आले होते. सकाळी प्रशासनाचे अधिकारी ,पोलिस बघुन या घटणेचा उलगड़ा झाला. या घटनेमुळे केळगाव सहित सिल्लोड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
एक दिवसांपूर्वी झाले होते अखेरचे बोलणे-
संदीप जाधव यांनी बुधवारी आपल्या वडिलांना फोन करून कुटुबांच्या व्यक्तींची खुशाली विचारली होती. बाबा मी चांगला आहे तुम्ही कसे आहात . माझ्या मुलाचा वाढदिवस आहे मी बोर्डर वर असल्याणे येवू शकत नाही. पण तुम्ही मुलाचा वाढदिवस साजरा करा मी लवकरच येतो. असे बोलुन् संदीप ने फोन कट केला.
केळगाव येथील सेवानिवृत्त सैनिक.......
केळगाव या गावातील अतापर्यन्त पंचवीस जवान हे देशसेवेसेत कार्यरत असून याची सुरुवात सन् 1982 सालापासून सुरु झाली.गावातील विलास कौतिक सुल्ताने यांनी 1982 साली सैन्यात दाखल होऊन ही सुरुवात केली.त्यानंतर विश्वनाथ खंडू शिंदे 1987,निवृत्ति परसराम मुळे 1988, भिकुलाल भालचंद्र बड़ोदे 1986,मानिकराव उत्तम गरुड़ 1996, गोकुळ हरी इवरे 1995,चिंधाराम रामदास निंभोरे 1984 ,रामदास भिकन मख 1989 या सनिकांनी देशसेवेसाठी आयुष्य वेचुन सेवानिवृत्त झाले असले तरी मात्र गावातील युवकांना देशसेवेसाठी प्रव्रुत्त केले.व तब्बल पंचवीस युवक हे आज मिल्ट्री मध्ये देशसेवेसाठी आपले कर्तुत्व बजावत आहे.
सैन्यात कार्यरत असलेले गावातील जवान.......
योगेश पोतदार,ज्ञानेश्वर मुळे,सोमनाथ विट्ठल कोल्हे,गजानन विश्वनाथ माखोडे,लक्ष्मण सुखदेव मुळे,कैलास तुकाराम मख,बबलू संजय जाधव,विकास जगन पवार,जगदीश भीमराव कोठाळकर, राजू भगवान डाखोरकर,समाधान साळुबा पगारे,दत्तू विश्वनाथ आदमाने,अमोल विश्वनाथ शिंदे यांच्यासह अजुन दहा ते बारां जवान सैन्यात सेवा बजावत आहे.
केळगाव येथील तीसरे जवान शहीद.....