उंडेगावकर महाराजांवर अंत्यसंस्कार
By Admin | Updated: September 3, 2014 02:38 IST2014-09-03T02:38:09+5:302014-09-03T02:38:09+5:30
जामखेड तालुक्यातील खर्डा पंचक्रोशीतील ह.भ.प. सीताराम महाराज उंडेगावकर (88) यांचा मंगळवारी दुपारी सीताराम गड खर्डा येथे समाधी सोहळा झाला.

उंडेगावकर महाराजांवर अंत्यसंस्कार
खर्डा (जि. अहमदनगर) : जामखेड तालुक्यातील खर्डा पंचक्रोशीतील ह.भ.प. सीताराम महाराज उंडेगावकर (88) यांचा मंगळवारी दुपारी सीताराम गड खर्डा येथे समाधी सोहळा झाला. राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
गुलाब महाराज खालकर(आर्वी, ता.जुन्नर), त्रिविक्रमानंदशास्त्री गणोशनंद गड (सिंदफणा, जि.बीड), ज्ञानेश्वर माऊली महाराज मंझरीकर (जि. बीड), रामकृष्ण रंधवे महाराज, (पाटोदा, जि.बीड), सीताराम महाराज उंडेगावकर यांचे उत्तराधिकारी महालिंग महाराज नगरे पंढरपूरकर यांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने सोहळा झाला. खर्डा, उंडेगाव (ता.परांडा, जि. उस्मानाबाद) येथील भाविकांच्या भावनिक वादात न्यायालयीन प्रक्रियेत उंडेगावकर महाराजांच्या समाधी सोहळ्यास न्यायालयीन प्रक्रियेस सामोरे जावे लागले. न्यायालयाच्या निकालानंतर समाधी सोहळा झाला.
उंडेगावकर महाराजांनी 85 मंदिरांची उभारणी केली. तीन कोटींर्पयत अन्नदान केले तर पंढरपूरच्या विठ्ठलास 28 तोडय़ांचे जानवे त्यांनी नुकतेच अर्पण केले. धार्मिक, सांस्कृतिक, व्यसनमुक्ती, तंटामुक्तीबरोबरच अन्नदानाचे मोठे काम त्यांनी केले. (वार्ताहर)