शोकाकुल वातावरणात शहीद राजेंद्र तुपारे यांच्यावर अंत्यसंस्कार

By Admin | Updated: November 8, 2016 14:07 IST2016-11-08T11:42:18+5:302016-11-08T14:07:35+5:30

पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात शहीद झालेले जवान राजेंद्र तुपारे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Funeral on Shaheed Rajendra Tupare in mourning atmosphere | शोकाकुल वातावरणात शहीद राजेंद्र तुपारे यांच्यावर अंत्यसंस्कार

शोकाकुल वातावरणात शहीद राजेंद्र तुपारे यांच्यावर अंत्यसंस्कार

>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर/चंदगड, दि. ८ -  जम्मू-काश्मीरच्या पूँछ येथे पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात शहीद झालेले जवान राजेंद्र तुपारे अनंतात विलीन झाले. चंदगड तालुक्यातील कारवे गावात मंगळवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान तुपारे यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.
सोमवारी सायंकाळी हवाई दलाच्या खास विमानाने तुपारे यांचे पार्थिव बेळगाव येथे आणण्यात आले. आज सकाळी कार्वे या त्यांच्या मूळ गावी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी गावक-यांसह पंचक्रोशीतील नागरिकही उपस्थित होते. लष्कराने त्यांना मानवंदना दिल्यानंतर त्यांचे पार्थिव अनंतात विलिन झाले. 
 

Web Title: Funeral on Shaheed Rajendra Tupare in mourning atmosphere