दलित तरुणावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

By Admin | Updated: July 5, 2015 01:53 IST2015-07-05T01:53:30+5:302015-07-05T01:53:30+5:30

बालसुधारगृहातून पळून गेल्यानंतर खून झालेल्या सनी शिंदे या दलित तरुणावर शनिवारी दुपारी बुरुडगावमध्ये हजारो दलित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पोलीस

The funeral of the police in the underworld | दलित तरुणावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

दलित तरुणावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

अहमदनगर : बालसुधारगृहातून पळून गेल्यानंतर खून झालेल्या सनी शिंदे या दलित तरुणावर शनिवारी दुपारी बुरुडगावमध्ये हजारो दलित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार झाले. खून झाल्यानंतर तब्बल चार दिवसांनंतर सनीवर अंत्यसंस्कार झाले.
सनीच्या खुनाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी सनीच्या अंत्यसंस्कारानंतर पत्रकारांशी बोलताना केली.
बुरुडगावमधील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी सनीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी सनी, त्याचे वडील आणि एका भावाला अटक केली होती. सनीच्या वडील व भावाला कोर्टाने पोलीस कोठडी दिली होती, तर त्याची बालसुधारगृहात रवानगी झाली होती. मात्र ३० मे रोजी तो सुधारगृहातून पळाल्यानंतर १ जुलैला त्याचा मृतदेह बीड जिल्ह्यात आढळून होता. त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एका नगरसेवकासह १५ जणांवर बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
शुक्रवारी सनीचा मृतदेह नगरमध्ये आणण्यात आला होता. मात्र त्याच्या नातेवाइकांनी अंत्यसंस्कारास नकार दिला होता. खा. आठवले आल्याशिवाय अंत्यसंस्कार होणार नाहीत, असा निर्णय त्याच्या नातेवाइकांनी घेतला होता.
चौघांना अटक
सनीच्या खुनाप्रकरणी चार संशयितांना नगर पोलिसांनी अटक करून पाटोदा (जि. बीड) पोलिसांच्या ताब्यात दिले. एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)

वाढते अत्याचार : नितीन आगे ते सनी शिंदे अशी दलितांच्या खुनांची मालिका वेदनादायी आहे. प्रेमप्रकरणातून असे खून होत आहेत, ही चीड आणणारी घटना आहे. आंतरजातीय व आंतरधर्मीय प्रेमसंबंधाला नकार देणाऱ्या कुटुंबावर समाजाने बहिष्कार टाकावा. आंतरजातीय विवाह होणाऱ्या जिल्ह्यांना १० कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, असे आठवले म्हणाले.

Web Title: The funeral of the police in the underworld