वीणा सहस्त्रबुध्दे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

By Admin | Updated: July 1, 2016 04:01 IST2016-07-01T04:01:08+5:302016-07-01T04:01:08+5:30

ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुध्दे (६८) यांच्या पार्थिवावर गुरूवारी सकाळी ८ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

Funeral on the part of Veena Sahastrabuddhe | वीणा सहस्त्रबुध्दे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

वीणा सहस्त्रबुध्दे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार


पुणे : ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुध्दे (६८) यांच्या पार्थिवावर गुरूवारी सकाळी ८ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीत व कला क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. वीणाताईंचे बुधवारी मध्यरात्री औंध येथील निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
वीणाताई अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १९४८ रोजी कानपूर येथे झाला. त्यांना घरातूनच ग्वाल्हेर गायकीचा वारसा मिळाला. वडील पं. शंकरराव बोडस व बंधू काशिनाथ बोडस यांच्याकडून त्यांना गाण्याची परंपरा मिळाली. त्यांनी काही वर्षे संगीत अध्यापन केले. वीणातार्इंकडून शिक्षण घेऊन संगीत क्षेत्रात अनेक कलावंत उदयास आले आहेत. गायकीबरोबरच बंदिशींची रचनाही त्यांनी केली. विपुल सांगीतिक लेखनाबरोबरच ध्वनिमुद्रित क्षेत्रात मोठे काम केले आहे. पुण्यातील एसएनडीटी विद्यापीठात त्यांनी संगीत शिक्षणाचे धडे दिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Funeral on the part of Veena Sahastrabuddhe