आत्माराम भेंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
By Admin | Updated: February 10, 2015 02:25 IST2015-02-10T02:25:43+5:302015-02-10T02:25:43+5:30
मराठी विनोदप्रधान नाटकांमध्ये प्रयोगशीलता जपत रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे ज्येष्ठ नाट्यकलावंत आत्माराम भेंंडे

आत्माराम भेंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
पुणे : मराठी विनोदप्रधान नाटकांमध्ये प्रयोगशीलता जपत रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे ज्येष्ठ नाट्यकलावंत आत्माराम भेंंडे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमेरिकेत वास्तव्याला असणाऱ्या भेंडे यांच्या कन्या पौर्णिमा माने, नातू आदित्य, तसेच स्नुषा उषा भेंडे, त्यांची मुले अमृता आणि अक्षय तसेच भेंडे यांचे नातेवाईक व मित्रपरिवारासह ज्येष्ठ कलावंत डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे, मंगला केंकरे, सुनील महाजन आदी मान्यवर अंत्यसंस्कारांच्या वेळी उपस्थित होते. गेल्या सहा महिन्यांपासून भेंंडे पुण्यात वास्तव्याला होते. शुक्रवारी त्यांना सकाळी ११ वाजता एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली, असे पौर्णिमा माने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)