गणिताचा पाया असणारी पावकी, निमकी अन् पाढे आता अ‍ॅपवर

By Admin | Updated: June 7, 2015 02:40 IST2015-06-07T02:40:32+5:302015-06-07T02:40:32+5:30

गणिताचा पाया पक्का करायचा म्हटले की पाढ्यांना पर्यायच नाही. मात्र, प्रत्येकालाच पाढ्यांशी गट्टी जमवायचा जरा कंटाळा येतो.

The fundamental breadth of the math, the snake and the shadow of the app now | गणिताचा पाया असणारी पावकी, निमकी अन् पाढे आता अ‍ॅपवर

गणिताचा पाया असणारी पावकी, निमकी अन् पाढे आता अ‍ॅपवर

हिनाकौसर खान-पिंजार ,  पुणे
गणिताचा पाया पक्का करायचा म्हटले की पाढ्यांना पर्यायच नाही. मात्र, प्रत्येकालाच पाढ्यांशी गट्टी जमवायचा जरा कंटाळा येतो. शिवाय आता कॅल्क्युलेटरच्या जमान्यात पाढे कोण पाठ करणार? विस्मरणात गेलेली पावकी, निमकी, पाऊणकीची अष्टकं कुठून लक्षात ठेवणार? मात्र ही कोष्टकं हसत-खेळत आणि ऐकत पाठ करण्याची किमया एका क्लिकवर आली आहे. अ‍ॅपवर आता पाढे पाठ करता येतील.
पाढ्यांना काहीतरी भयंकर समजून अंकगणिताशी कट्टी करणाऱ्या मुलांना अ‍ॅपच्या माध्यमातून सहजगत्या पाढे स्मरणात ठेवता येणार आहेत. मुले मोबाईलवर ‘गेम’ खेळतात. गाणी ऐकतात. ते आता पाढेही ऐकू शकतील. निर्मिती एपिकचे मंदार नामजोशी यांनी ही किमया साधली आहे. ते म्हणाले, ‘ विज्ञान समजून घेण्यासाठी गणिताची मजा समजणेही आवश्यक असते. गणित सोपे वाटू लागल्यावर आपोआपच मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्यासाठी हरवत चाललेले पाढे महत्त्वाचे वाटले. शिवाय केवळ मराठी भाषेत पाढ्यांची, कोष्टकांची गमंत आहे. मग, तीच आपल्या मुलांना देण्याचे ठरले. मागील तीन-चार वर्षांपासून यावर काम सुरू होते. गुगल प्लेस्टोअरमध्ये अंकनाद टाईप केल्यानंतर अंकनादाचे १ ते १२ पर्याय उपलब्ध होतात. यामध्ये पावकी, निमकी, पाऊणकी,सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्री, १ ते १०० अंक, २ ते १० पाढे, ११ ते २० पाढे, २१ ते ३० पाढे असे १२ पर्याय उपलब्ध होतात.

Web Title: The fundamental breadth of the math, the snake and the shadow of the app now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.