फन किड रेसिंग
By Admin | Updated: June 23, 2015 01:56 IST2015-06-23T01:56:53+5:302015-06-23T01:56:53+5:30
हाय फ्रेंड्स रोज तुम्ही आई-बाबांच्या मोबाइलवर नाही तर कॉम्प्युटरवर गेम खेळता. पण अनेकदा तेच तेच गेम खेळून कंटाळा येत असेल ना! काही तरी नवे गेम्स मिळावेत असेही

फन किड रेसिंग
तुषार भामरे -
हाय फ्रेंड्स रोज तुम्ही आई-बाबांच्या मोबाइलवर नाही तर कॉम्प्युटरवर गेम खेळता. पण अनेकदा तेच तेच गेम खेळून कंटाळा येत असेल ना! काही तरी नवे गेम्स मिळावेत असेही वाटत असेल! तुमची हीच गरज ओळखून इंट्रेस्टिंग गेम्सची माहिती देणार आहोत. सो लेट्स प्ले...
कार आणि बाइक रेसिंगचे गेम खरं तर खेळायला जड जातात. पण हा गेम मात्र तुम्ही अगदी एका बोटाने खेळू शकता आणि तुमची कार रेसिंग लाइनच्या पार करू शकता. 'फन किड रेसिंग’ हा तुमच्यासाठी बेस्ट आणि सोपा असा रेसिंग गेम आहे. कारच्या प्लिप्स, जंप्स आणि रोल करण्याने हा गेम खेळताना धमाल येते. इतर रेसिंग गेम्सप्रमाणे यात हार्ड लेव्हल्स नाहीत आणि हार्ड कंट्रोल्सही नाहीत.
यात तुम्ही तुमच्या आवडीची फास्ट स्पोटर््स कार, जीप किंवा अगदी मोटारसायकलही निवडू शकता. रँप्सवर चढून किंवा हिल्सवरून घसरून तुम्ही तुमच्या स्पोर्टी कारला स्पीड देऊ शकता. यात प्रत्येक लेव्हलवर एक सरप्राइझ तुमची वाट पाहत असेल. खूप सारे कॉइन्स आणि जिंकण्याची भरपूर संधी तुम्हाला इथे मिळेल. यातले ट्रॅक्स सोप्या पद्धतीने डिझाइन केले असल्यामुळे तुम्ही या ट्रॅक्सवर स्टंट्ससुद्धा करू शकता. कार स्पिन करणं, बॅकफ्लिप करणं किंवा हे दोघं एकसाथसुद्धा तुम्ही करू शकता. शिवाय यातली म्युझिक तुम्हाला हा गेम राइड करताना मजेशीर साथ देईल. अॅण्ड्रॉइड फोनधल्या प्लेस्टोअरमधून तुम्हाला हा गेम फ्री डाऊनलोड करता येईल.