फुकट्या प्रवाशांकडून १0 लाख दंड वसूल

By Admin | Updated: August 2, 2016 05:10 IST2016-08-02T05:10:16+5:302016-08-02T05:10:16+5:30

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाने २२ ते ३१ जुलैमध्ये विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान दोन हजार ५९८ फुकटे प्रवासी आढळून आले.

Fukatya receives 10 million penalties from the passengers | फुकट्या प्रवाशांकडून १0 लाख दंड वसूल

फुकट्या प्रवाशांकडून १0 लाख दंड वसूल

अकोला : मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाने २२ ते ३१ जुलैमध्ये विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान दोन हजार ५९८ फुकटे प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून रेल्वेने तब्बल १0 लाख २७ हजार ६६ रुपयांचा दंड वसूल केला.
विभागातील अमरावती, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नाशिक, धुळे, खंडवा, बऱ्हाणपूर आदी प्रमुख रेल्वे स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी करण्यात आली. ४८ प्रवाशांकडून १३ हजार ४४0 रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती विभागीय जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Fukatya receives 10 million penalties from the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.