फरार कैद्याला अटक

By Admin | Updated: April 4, 2015 04:22 IST2015-04-04T04:22:31+5:302015-04-04T04:22:31+5:30

पन्हाळा न्यायालयात साक्ष देण्यासाठी नेताना पोलिसांच्या डोळ्यांत चटणीपूड टाकून पळून गेलेला विजय ऊर्फ बबलू संजय जावीर (३५) याच्यासह त्याचे

Fugitive prisoner arrested | फरार कैद्याला अटक

फरार कैद्याला अटक

कोल्हापूर : पन्हाळा न्यायालयात साक्ष देण्यासाठी नेताना पोलिसांच्या डोळ्यांत चटणीपूड टाकून पळून गेलेला विजय ऊर्फ बबलू संजय जावीर (३५) याच्यासह त्याचे साथीदार पिंटू जाधव व अंकुश गारड या तिघांना नांदेड येथे अटक करण्यात आली. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, आर्थिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या पथकाने नांदेड पोलिसांच्या मदतीने बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
विजय जावीर हा बिंदू चौक सबजेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. एका चोरीच्या प्रकरणाची पन्हाळ्यातील प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी होती. त्यासाठी मुख्यालयातील दोन पोलीस गेल्या वर्षी ८ डिसेंबर रोजी सकाळी जावीरला घेऊन एसटीने पन्हाळ्यास गेले. स्टँडवरून भाडेकर बोळातून कोर्टाकडे जाताना त्याच्या साथीदारांनी पोलिसांच्या डोळ््यात चटणीपूड टाकली. त्याचा फायदा घेत जावीरने हेडकॉन्स्टेबल अशोक गंगाराम कोरवी यांना ठोसा देऊन जखमी केले व मोटारसायकलीवरून तो साथीदारांसह पसार झाला. या प्रकरणी दोन कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले होते. पोलीस गेले चार महिने त्यांचा शोध घेत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Fugitive prisoner arrested