साताऱ्यात बैलगाडी मालकांचा मोर्चा
By Admin | Updated: March 10, 2015 04:06 IST2015-03-10T04:06:27+5:302015-03-10T04:06:27+5:30
बैलगाडी शर्यतीवर घालण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर

साताऱ्यात बैलगाडी मालकांचा मोर्चा
सातारा : बैलगाडी शर्यतीवर घालण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या समितीने चक्क शर्यतीचे बैल साताऱ्यात पळवले आणि जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली आहे. तथापि, याबाबत तीव्र नापसंती दर्शवत ही बंदी तत्काळ उठवावी, या मागणीसाठी बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, याबाबत निर्णय न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. शर्यतीच्या बैलगाड्या आणि बैलांचा गराडा जिल्हाधिकारी कार्यालयाला पडला. यामुळे येथे जवळपास तासभर वाहतूक कोंडी झाली. (प्रतिनिधी)