शिवसेना नगरसेवकांचा बेस्ट भवनावर मोर्चा
By Admin | Updated: May 2, 2016 17:39 IST2016-05-02T15:16:26+5:302016-05-02T17:39:58+5:30
५२ मार्गावरील बसेस बंद केल्याने शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांनी बेस्ट भवनावर मोर्चा काढला आहे.
_ns.jpg)
शिवसेना नगरसेवकांचा बेस्ट भवनावर मोर्चा
ऑनलाइन लोकमत
मुंबई - ५२ मार्गावरील बसेस बंद केल्याने शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांनी बेस्ट भवनावर मोर्चा काढला आहे. हे नगरसेवक बेस्ट अध्यक्ष आणि महाव्यवस्थापकांना भेटून त्यांना बस बंद करण्याविषयी जाब विचारणार आहेत.
नगरसेवकांना विश्वासात न घेता तडकाफडकी बस बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे नगरसेवक आपल्या मागण्या बेस्ट महाव्यवस्थापकांच्या कानावर घालणार आहेत.
त्यानंतरही त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर, उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. बंद केलेल्या मार्गावरील बसेस तोटयात होत्या असे कारण बेस्ट प्रशासनाने दिले आहे.