पोलीस ठाण्यासमोरील एका दुकानातून शनिवारी रात्री चोरट्यांनी एक लाख ७0 हजार रुपयांची रोकड लांबवित पोलिसांना जणू आव्हान दिले आहे.
पोलीस ठाण्यासमोरच दुकान फोडले
बोदवड : पोलीस ठाण्यासमोरील एका दुकानातून शनिवारी रात्री चोरट्यांनी एक लाख ७0 हजार रुपयांची रोकड लांबवित पोलिसांना जणू आव्हान दिले आहे. बुरहानी टिंबर या दुकानावरील पत्रे काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला व रोकडलांबवली. रविवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. दुकान मालक असगर अली बोहरी यांनी रमजान महिन्यासाठी वर्षभरापासून ही रक्कम जमविली होती. चोरट्यांनी दुकानातील साहित्याचीही फेकाफेक केल्याचे आढळून आले. उशिरापर्यंत गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले. वाढत्या चोर्यांमुळे शहरातील दुकानदारांमध्येभीती पसरली आहे. यापूर्वी आठ ते दहा ठिकाणी चोर्या झाल्या आहेत. त्याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. (वार्ताहर)
Web Title: In front of the police station, the shop was opened