शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोठ मोठ्या वल्गना करणाऱ्या पक्षांपुढे आधी लढाई ‘नोटा’शी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 06:22 IST

मोठ मोठ्या वल्गना करणाऱ्या अनेक पक्षांपुढे याहीवेळी अनामत सुरक्षित ठेवण्यापेक्षा नोटाचेच मोठे आव्हान राहणार आहे. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत नोटानेच अनेक पक्षांचे कपडे उतरविले.

मोठ मोठ्या वल्गना करणाऱ्या अनेक पक्षांपुढे याहीवेळी अनामत सुरक्षित ठेवण्यापेक्षा नोटाचेच मोठे आव्हान राहणार आहे. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत नोटानेच अनेक पक्षांचे कपडे उतरविले. महाराष्ट्रात गेल्यावेळी ६३ पक्ष आणि इतर अपक्ष मिळून एकूण ८९७ उमेदवार होते. यापैकी तब्बल ६०७ म्हणजे ६८ टक्के उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मते पडली. ४४६ पैकी ३७० अपक्षांना नोटाची संख्याही गाठता आली नाही. रायगड आणि हिंगोलीत विजयी उमेदवाराला प्राप्त मताधिक्याहून जास्त मते नोटाला मिळाली.गेल्या निवडणुकीत आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, लोकभारती, जेडीएस, खोरिपा, इंडिनय युनियन मुस्लिम लीग, तृणमूल काँग्रेस, सीपीआय एमएल, अ.भा. जनसंघ, हिंदू महासभा, शिवराज्य पार्टी यांच्यासह ४० पक्षांचे सर्व उमेदवार नोटाच्याही मागे राहिले. आम आदमी पार्टीचे ४८ पैकी १४ उमेदवार, बसपाचे ४८ पैकी ७ जण, समाजवादी पार्टीचे २३ पैकी २१ उमेदवार, भारिप बहुजन महासंघाचे २३ पैकी १५, रिपाइंचे ८ पैकी ७, गोंगपा व भाकपाचे प्रत्येकी ४ पैकी ३ जण आणि जेडीयूएचे ३ पैकी एक उमेदवाराला नोटाने मागे टाकले होते.काँग्रेस (२६), भाजपा (२४), राष्ट्रवादी (२१), शिवसेना (२०), माकपा (४), शेकाप (३), स्वाभिमानी पक्ष (२), रासप आणि रिपाइं (ए) (१) या प्रमुख पक्षांना लढलेल्या सर्व जागांवर नोटापेक्षा जास्त मते मिळाली. नागपूर (२९/३३), मुंबई उत्तर (१८/२१), औरंगाबाद (२३/२७), ठाणे (२२/२६), लातूर (१५/१८), परभणी (१४/१७), सोलापूर (३/१६), मुंबई दक्षिण (१६/२०), पुणे (२३/२९), नंदूरबार (७/९), बुलडाणा (१३/१७), मुंबई उत्तर मध्य (१६/२१) आणि मुंबई दक्षिण मध्य (१६/२१) या १३ मतदारसंघात ७५ टक्क्क््यांहून जास्त उमेदवार नोटाच्याही मागे राहिले. नागपुरात तब्बल ८८ टक्के उमेदवार नोटापेक्षा पिछाडीवर होते. नंदूरबारमध्ये नोटाने रेकॉर्डच केला. येथे एकूण ९ उमेदवार होते. विजयी व पराभूत या पहिल्या दोन उमेदवारानंतर तिसऱ्या क्रमांकाची मते येथे नोटाला मिळाली. बाकी ७ उमेदवार नोटाच्या मागेच राहिले. अकोल्यात ७ पैकी ५ जणांनी नोटावर मात केली, येथे फक्त दोघेच पिछाडीवर राहिले. नोटाला सर्वाधिक २१ हजारांहून जास्त मते गडचिरोली, पालघर व नंदूरबार या तीन ठिकाणी मिळाली. या तिन्ही जागा आदिवासी राखीव आहेत. नोटाला सर्वांत कमी २३२३ मते बीडमध्ये मिळाली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtraमहाराष्ट्र