सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या मतदानावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली, दोन सदस्यांना यावेळी पोलिसांनी अटकदेखील केली होती. यामुळे आता सातारा पोलिसांवर आरोप सुरू आहेत. याबाबत आज विधिमंडळात मुद्दा चांगलाच गाजला. आज विधिमंडळातमंत्री शंभुराज देसाई यांनी मोठा आरोप केला. यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्यासह धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे निर्देश दिले.
'आमच्या धमकीला अमेरिका घाबरली', डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर इराणची पहिली प्रतिक्रिया
आयपीएस तुषार दोशी याआधीही चर्चेत आल होते. या आधी ते जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या मराठा आंदोलकांवरील लाठीमार प्रकरणी वादात आले होते. आंदोलकांवर झालेल्या कारवाईनंतर त्यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. आता पुन्हा एकदा ते सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून चर्चेत आले आहेत.
आयपीएस अधिकारी तुषार दोशी हे २००१ बॅचचे आहेत. त्यांचे पहिले पोस्टिंग चंद्रपूरमध्ये झाले होते. त्यांच्याकडे चंद्रपूरमधली राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. दोशी यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. पुणे पोलीस दलात सायबर विभागाचे उपायुक्तपद त्यांच्याकडे होते. त्यानंतर, त्यांनी नवी मुंबईतील पोलीस उपायुक्तपदी काम पाहिले. याचदरम्यान, २०१८ मध्ये एजाज खान अटक प्रकरण आणि अश्विनी बिद्रे -गोरे हत्या प्रकरणामुळे ते चर्चेत आले होते.
जालना येथे मराठा आरक्षणावेळी झालेल्या लाठीचार्जमुळे ते चर्चेत आले होते. यावेळीही त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली होती, यावेळी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.
यानंतर त्यांची सातारा येथे जिल्हा पोलिस अधिक्षक पदावर बदली झाली. यानंतर ते फलटण येथे झालेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळेही चर्चेत आले. महिला डॉक्टरने आत्महत्या केली. यावेळी तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेने तिच्यावर बलात्कार आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणावेळीही पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे विधान चर्चेत आले होते. तपासानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले होते की, मृत डॉक्टर आणि आरोपी यांच्यामध्ये वारंवार चॅटिंग सुरू होते. डॉक्टर महिला आरोपींच्या संपर्कात होती, असे ते म्हणाले होते. या विधानानरून जोरदार चर्चा झाली होती.
विधिमंडळात कारवाईची मागणी
दरम्यान, आज साताऱ्यातील गोंधळावरून मंत्री शंभुराज देसाई यांनी आयपीएस अधिकारी दोशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. 'आम्हाला दहा-दहा पोलीस मिळून ओढतो होते. कोणी आमच्या दंडाला, कोणी पायाला, कोणी कंबरेला पकडले होते. एखाद्या गुन्ह्यातील आरोपीला पकडतात तसे पोलीस मंत्र्यांना धरुन खेचत होते', असेही शंभुराज देसाई म्हणाले. यावेळी सभापती यांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
Web Summary : IPS Tushar Doshi faces scrutiny after a ruckus in Satara Zilla Parishad election and prior involvement in Jalna lathi charge. Accusations of misconduct led to calls for suspension in assembly.
Web Summary : सतारा जिला परिषद चुनाव में हंगामे और जालना लाठीचार्ज में पहले शामिल होने के बाद आईपीएस तुषार दोशी जांच के दायरे में हैं। विधानसभा में दुर्व्यवहार के आरोपों के बाद निलंबन की मांग की गई।