व्हॉट्सअॅपवरची मैत्री पडली महागात
By Admin | Updated: August 6, 2014 00:28 IST2014-08-06T00:28:58+5:302014-08-06T00:28:58+5:30
व्हॉट्सअॅपवर झालेल्या आठ दिवसांच्या मैत्रीतून एका 13 वर्षीय मुलीला बीअर पाजून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात घडली.

व्हॉट्सअॅपवरची मैत्री पडली महागात
ठाणो : व्हॉट्सअॅपवर झालेल्या आठ दिवसांच्या मैत्रीतून एका 13 वर्षीय मुलीला बीअर पाजून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात घडली. याप्रकरणी अत्याचारी नराधमासह त्याला मदत करणा:या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना 8 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोलशेत येथे राहणारी पीडित मुलगी ही सातवीत शिकते. तिच्यावर अत्याचार करणा:या जगदीश सोळंखी याच्याशी तिची व्हॉट्सअॅप मैत्री झाली. फ्रेंडशिप डेच्या आधीच 8 दिवस ही मैत्री झाली. फ्रेंडशिप डे असल्याने त्याने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, ती रविवारी न येता सोमवारी दुपारी मैत्रिणीसोबत तीन हात नाक्यावर आली. याचदरम्यान, तिच्यासोबत आलेल्या मैत्रिणीने घरचे कारण सांगून घरी जायचे असे सांगितल्यावर जगदीशने तिला रिक्षात बसवून 5क् रुपयेही दिले. तेव्हाच तेथे जगदीशचा आणखी एक मित्र आला. त्यांनी बीअर घेऊन तिला जगदीशच्या घरी नेले. (प्रतिनिधी)
तिला बीअर पाजली. त्यानंतर जगदीशने मित्रला बाहेर पाठवत तिच्यावर अत्याचार केला. याचदरम्यान, त्याचे पालक घरी आल्यावर त्यांनी त्या दोघांना चोप देऊन तिला घरी सोडण्यास सांगितले. त्यानंतर या दोघांनी तिच्याशी ओळख करून देणा:या मित्रस बोलावून तिला घरी सोडण्यास सांगितले.
मात्र, तिच्या घरच्यांनी तिला चालता येत नसल्याचे पाहून त्याला चोप देत पोलिसांत तक्रार केली. नशा उतरल्यावर जगदीशने तिच्यावर अत्याचार केल्याची तिने माहिती दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून जगदीशसह राज मोरे आणि राहुल यांना अटक केली.