शिवसेनेशी मैत्री कायम

By Admin | Updated: October 2, 2014 01:35 IST2014-10-02T01:35:41+5:302014-10-02T01:35:41+5:30

निवडणूक लढविताना शिवसेनेबरोबरच्या संबंधात कटुता येणार नाही असा आमचा प्रयत्न राहील, असे भाजपाचे राज्याचे निवडणूक प्रभारी ओम माथुर यांनी बुधवारी स्पष्ट केल़े

Friendship with Shiv Sena | शिवसेनेशी मैत्री कायम

शिवसेनेशी मैत्री कायम

शिर्डी (अहमदनगर) : शिवसेनेबरोबरची आमची मैत्री कायम आहे. निवडणूक लढविताना शिवसेनेबरोबरच्या संबंधात कटुता येणार नाही असा आमचा प्रयत्न राहील, असे भाजपाचे राज्याचे निवडणूक प्रभारी ओम माथुर यांनी बुधवारी स्पष्ट केल़े
लोकसभेत आमच्याबरोबर असलेल्या घटक पक्षांनाही कमी अधिक करून महायुतीत सामावून घ्यावे, अशी भाजपाची भूमिका होती़ मात्र शिवसेनेकडून घटक पक्षांना दुर्लक्षित केल्यानेच युती तुटली आणि त्यामुळेच अन्य पक्ष आमच्याबरोबर आल्याचे त्यांनी सांगितल़े उद्धव ठाकरे काहीही म्हणोत त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असे ते म्हणाले. निवडणुकीत शिवसेना नव्हे तर, काँग्रेस- राष्ट्रवादी आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आमचे टार्गेट असेल़ राज्यात ज्या दीडशे जागांवर भाजपाने कधीही उमेदवार उभे केले नाही, त्या जागांसह पोलिंग बुथ व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे ते म्हणाल़े (तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: Friendship with Shiv Sena