शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आधी जवळ आलेले मित्र मविआपासून दूर, महादेव जानकर गेले, राजू शेट्टीही दूर, प्रकाश आंबेडकरांची शक्यता धूसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 06:54 IST

ॲड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता कमी कमी होत चालली आहे. 

मुंबई : केंद्र आणि राज्यातही सत्ता नसलेल्या महाविकास आघाडीकडे इतर लहान पक्ष जात असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत होते. पण, माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर सोबत येता येता अचानक महायुतीसोबत गेले. माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही आता अंतर राखले असल्याचे चित्र आहे. तिसरे महत्त्वाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता कमी कमी होत चालली आहे. 

शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे भाजपचे मोठे मित्रपक्ष. या शिवाय तुलनेने लहान असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, जानकर यांचा रासप, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, आ. विनय कोरे यांची जनसुराज्य पार्टी, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांचा बहुजन रिपब्लिकन एकता मंच हेही भाजपचे मित्रपक्ष आहेत. 

आठवले यांनी महायुतीकडे लोकसभेच्या दोन जागा मागितल्या होत्या, पण त्यांना एकही मिळाली नाही. जानकर आधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटले आणि ते महाविकास आघाडीत जाणार असे चित्र निर्माण झाले. मात्र जानकरांनी यू टर्न घेत महायुतीतच राहणे पसंत केले. 

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे सहा जागा मागितल्या आहेत. आघाडीने त्यांना पाच जागा देऊ केल्याचे आता म्हटले जात आहे. आंबेडकर यांनी मंगळवारी ‘एक्स’वर असे म्हटले की, माझ्या आजोबांनी चालविलेली चळवळ लाचारीच्या विरोधात होती. लाचारी मी मान्य करणार नाही. आघाडीत अडचणी येऊ नयेत म्हणून व्यक्तिगत हेवेदावे आम्ही येऊ दिले नाहीत, पण चळवळीलाच लाचार केले जात असेल, तर ते कदापिही मान्य करणार नाही. आंबेडकर यांच्या या विधानांचा रोख काँग्रेस-राष्ट्रवादीवर असल्याचे मानले जाते.

...म्हणून शेट्टींनी राखले अंतर राजू शेट्टी महाविकास आघाडीत न जाण्याचे कारण वेगळे आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे प्रमुख घटकपक्ष असलेल्या या आघाडीत आपण गेलो तर साखर कारखानदारांच्या नेत्यांशी पुन्हा एकदा जवळीक केली अशी टीका होईल आणि आपला मतदार आपल्यापासून दुरावेल, असे वाटत असल्याने ते जाणीवपूर्वक महाविकास आघाडीपासून दूर राहत आहेत. शिवसेनेने आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. परंतु तुम्ही मला पाठिंबा द्या, पण मी महाविकास आघाडीमध्ये येणार नाही, असे राजू शेट्टी यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीRaju Shettyराजू शेट्टीMahadev Jankarमहादेव जानकर