फेसबुकवर मैैत्री करुन बलात्कार, फसवणूक
By Admin | Updated: March 7, 2017 04:39 IST2017-03-07T04:39:55+5:302017-03-07T04:39:55+5:30
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करून तसेच नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये लुटणाऱ्या आरोपीला वालीव पोलिसांनी अटक केली

फेसबुकवर मैैत्री करुन बलात्कार, फसवणूक
विरार/वार्ताहर : एका महिलेशी फेसबुकवर मैैत्री करून तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करून तसेच नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये लुटणाऱ्या आरोपीला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. कुणाल जयशंकर वर्मा (३१) असे आरोपीचे नाव आहे.
वसईतील एका पिडीत ३४ वर्षीय महिलेची कुणालशी फेसबुकवर मैैत्री झाली होती. मैैत्री झाल्यानंतर कुणालने तिला प्रेमाच्या जाळ््यात ओढले.लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारिरिक संबंध ठेवले. तिच्याकडून ५ लाख २४ हजार रुपये उकळले़ त्यानंतर तो फरार झाला़