शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एकत्र परिवार असतानाही कौटुंबिक कलहाची वारंवार अफवा; अजित पवार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 16:14 IST

अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत भावनांना वाट मोकळी करून दिली. 

मुंबई : काल मी माझ्या सद्सद् विवेक बुद्धीला स्मरून राजीनामा दिला. यामुळे माझ्या वरिष्ठांना, हितचिंतकांना वेदना झाल्या. मी उपमुख्यमंत्री असतानाही असाच एक प्रसंग आला होता. मी कोणालाही न विचारता राजीनामा दिला होता. कालही हाच प्रकार केला. मी कार्यकर्त्यांचीही माफी मागतो, असे अजित पवार यांनी सांगितले. आज अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत भावनांना वाट मोकळी करून दिली. 

विधानभवनामध्ये मी 5.30 च्या सुमारास गेलो. विधानसभाध्यक्ष बागडेंच्या पीएकडे राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी मी त्यांना फोन केलेला, की तुम्ही मुंबईत कधी आहात असे विचारले होते. मी राज्य बँकेचा संचालक होतो. शरद पवार हे माझे नातेवाईक आहेत म्हणून त्यांचे नाव घेण्यात आले. राज्य बँकेने एखाद्या गिरणीला, कारखान्याला पैसे दिले ते त्यांनी कसे खर्च केले त्याची चौकशी केली तर मला काही आक्षेप नाही. अन्याय झाला तर न्यायपालिका आहेत. त्यांनी त्यांना हवा तो तपास करावा. मात्र, 2008 चे प्रकरण असताना आज निवडणुकीच्या काळात का गुन्हा दाखल केला. यामुळे शरद पवारांना या गोष्टीचा त्रास झाला, असेही त्यांनी सांगितले. 

मी सकाळी मुंबईकडे निघालो. मात्र, कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे निघाल्याने टोल नाक्यांवर माझे दोन दोन तास गेले. दुपारी 2 वाजता मी मुंबईत पोहोचलेलो. तोपर्यंत ईडीकडे न जाण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला होता. त्यामुळे माध्यमांनी लगेचच अजित पवार आले नसल्याची विचारणा सुरू केली. राजीनामा दिल्यानंतर मी मुंबईतील एका नातोवाईकाकडे थांबलो. शरद पवारांनी मला भेटण्यास सांगितले. आमच्यात कौटुंबीक कलह कुठून आले? असा सवालही त्यांनी केला. 

हे थांबवा...मी जेव्हा राजकारणात आलो, तेव्हाही आमच्यात कलह असल्याची चर्चा केली गेली. शरद पवार आणि अजितदादा यांचे दोन गट असल्याचे बोलले गेले. सुप्रिया राजकारणात आली तेव्हाही हेच घडले आणि आताही तेच. पवार कुटुंब मोठा परिवार आहे. आमच्यात कोणतेही वाद नाहीत तेव्हा हे कृपया थांबवा असे आवाहन अजित पवार यांनी केले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस