स्वातंत्र्यसैनिक रमाबहन रुईया यांचे निधन

By Admin | Updated: March 31, 2016 01:51 IST2016-03-31T01:51:55+5:302016-03-31T01:51:55+5:30

स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ समाजसेविका व वर्धा येथील महिला सेवा मंडळाच्या (महिलाश्रम) सर्वेसर्वा रमाबहन श्रीनिवास रुईया ऊर्फ मामीजी यांचे बुधवारी सकाळी १० वाजता नागपूर येथे निधन झाले.

Freedom fighter Ramabahan Ruia dies | स्वातंत्र्यसैनिक रमाबहन रुईया यांचे निधन

स्वातंत्र्यसैनिक रमाबहन रुईया यांचे निधन

वर्धा : स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ समाजसेविका व वर्धा येथील महिला सेवा मंडळाच्या (महिलाश्रम) सर्वेसर्वा रमाबहन श्रीनिवास रुईया ऊर्फ मामीजी यांचे बुधवारी सकाळी १० वाजता नागपूर येथे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे मुलगा पवन रुईया व मुलगी चेतना राणीवाला तसेच मोठा चाहता वर्ग आहे.
गुरुवारी सकाळी ११ वाजता येथील महिलाश्रमच्या मैदानावर शांतीबाई राणीवाला यांच्या स्मारकाजवळ त्यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच १ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता महिलाश्रमच्या परिसरात शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. स्वातंत्र्यसैनिकांना मिळणाऱ्या कोणत्याही सोयींचा लाभ त्यांनी घेतला नाही. महिलाश्रम डी. एड्. कॉलेजच्या त्या अनेक वर्षे प्राचार्य होत्या. परंतु त्यांनी कधीही वेतन घेतले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Freedom fighter Ramabahan Ruia dies