नाशिक, नगर मधून जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: October 30, 2015 17:50 IST2015-10-30T17:50:46+5:302015-10-30T17:50:46+5:30
तहानलेल्या मराठवाड्यासाठी नगर व नाशिकमधून जायकवाडी धरणात १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला

नाशिक, नगर मधून जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - तहानलेल्या मराठवाड्यासाठी नगर व नाशिकमधून जायकवाडी धरणात १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अनिल कदम या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पाणी देण्याच्या निर्णयास विरोध करतानाच याचिका दाखल केली होती.
नाशिकमध्येच हजारो गावं दुष्काळी असताना इथलं पाणी देण्यात येऊ नये अशी भूमिका कदम व अन्य विरोधकांनी घेतली आहे. विशेष म्हणजे भाजपा वगळता सगळे पक्ष या निर्णयाविरोधात आहेत. मात्र, भाजपाने मराठवाड्यासाठी जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्थात, किती पाणी सोडायचे, नक्की गरज किती आहे याबाबत राज्याच्या जलसंपदा महामंडळाची पूर्वपरवानगी घेऊनच अशा प्रकारचा निर्णय घ्यावा असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वाट्टेल त्या परिस्थितीत नाशिकचं पाणी वळवू देणार नाही अशी भूमिकाही कदम यांनी मांडली आहे, त्यासाठी आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे.
या सगळ्या प्रकारावरून येत्या काळात पाण्यावरून प्रदेशा प्रदेशामध्ये संघर्ष घडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.