शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मराठा, कुणबी उमेदवारांना शासन देणार मोफत ‘UPSC’चे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 19:12 IST

राज्यात २२५ मराठा, कुणबी उमेदवारांना यूपीएससी प्रशिक्षण निवडीसाठी सारथीकडून परीक्षा घेतली जाणार आहे.तसेच दरमहा १३ हजार रूपये विद्यावेतन दिले जाईल.

अमरावती : मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगात (यूपीएससी) टक्केवारी वाढावी, यासाठी राज्य शासनाची छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) विद्यावेतन देणार आहे. दिल्ली येथे यूपीएससीच्या प्रशिक्षणासाठी होणारा खर्च शासन उचलणार आहे. 

राज्यात २२५ मराठा, कुणबी उमेदवारांना यूपीएससी प्रशिक्षण निवडीसाठी सारथीकडून परीक्षा घेतली जाणार आहे.तसेच दरमहा १३ हजार रूपये विद्यावेतन दिले जाईल. दिल्ली येथील नामांकित संस्थेत यूपीएससीचे प्रशिक्षण देण्याचा मानस आहे. सन २०२० मध्ये होणाऱ्या यूपीएससी पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी मराठा, कुणबी समाजातील उमेदवारांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. त्याकरिता ‘सारथी-दिल्ली यूपीएससी सीईटी परीक्षा २०१९’ ही प्रवेश परीक्षा ३१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. यातील गुणवत्ता यादीनुसार २२५ उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या उमेदवारांना पहिल्यांदाच यूपीएससी परीक्षेची माहिती देण्यासाठी पुणे येथे १५ दिवस निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.  दिल्ली येथील यूपीएससी प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथी भरणार आहे. यासह प्रशिक्षण संस्थेत जाण्यासाठी प्रवेश खर्च, राहण्याची व्यवस्था करण्यासाठी १५ हजार रुपये एकतर्फी अनुदान दिले जाणार आहे. 

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

मराठा, कुणबी उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रशिक्षणासाठी सामाईक परीक्षेचा ऑनलाईन अर्ज ७ मार्च पासून ‘सारथी’च्या संकेत स्थळावर प्रारंभ झाला. या परीक्षेतून २२५ उमेदवारांची निवड केली जाईल. यात ३० टक्के जागा महिला, तर तीन टक्के जागा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्रातील कुणबी, मराठा असावा, अशी अट आहे. तो पदवीधर आणि यूपीएससी सन २०२० ची परीक्षा देण्यास पात्र असावा, असे नमूद आहे. तर, पालकांचे उत्पन्न आठ लाखांच्या आत असावे, अशी नियमावली शासनाने घातली आहे.

‘सारथी’च्या संकेतस्थळावर यूपीएससी प्रशिक्षण सामाईक परीक्षेसंदर्भात माहिती उपलब्ध आहे. मराठा, कुणबी समाजातील उमेदवारांना ही माहिती ऑनलाईन अर्जाद्वारे पाठवावी लागणार आहे. गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड होईल - विजय साळवे, सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, अमरावती

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगdelhiदिल्लीmarathaमराठाkunbiकुणबीexamपरीक्षा