नगरसेवकांना सी लिंकवर मोफत प्रवास

By Admin | Updated: August 28, 2014 03:29 IST2014-08-28T03:29:28+5:302014-08-28T03:29:28+5:30

मोफत बसप्रवास, लॅपटॉप, मोबाइलनंतर आता वांद्रे-वरळी सागरीसेतूवरून मोफत प्रवासाला पालिकेने हिरवा कंदील दाखवला आहे़

Free travel to C ++ links to the corporators | नगरसेवकांना सी लिंकवर मोफत प्रवास

नगरसेवकांना सी लिंकवर मोफत प्रवास

मुंबई : मोफत बसप्रवास, लॅपटॉप, मोबाइलनंतर आता वांद्रे-वरळी सागरीसेतूवरून मोफत प्रवासाला पालिकेने हिरवा कंदील दाखवला आहे़ एका पाठोपाठ एक मागण्या मंजूर होत असल्याने नगरसेवकांच्या प्रस्तावांची यादीही सुसाट धावत आहे़
मुंबईतील २२७ वॉर्डांमधून निवडून आलेले नगरसेवक आपापल्या वॉर्डांचे प्रतिनिधित्व करीत असतात़ यासाठी त्यांना पालिकेकडून दर महा दहा हजार रुपये मानधन व प्रत्येक बैठकीचे दीडशे रुपये भत्ता दिला जातो़ मात्र सेवेचे मोल वसूल करण्यासाठी मागण्यांची यादीच नगरसेवक प्रशासनाला सादर करीत आहेत़ यापैकी एक असलेली वांद्रे-वरळी सागरीसेतूवर नगरसेवकांच्या वाहनांना मोफत प्रवासाची़
ही मागणी प्रशासनाने मंजूर केल्याचे पालिकेच्या महासभेत आज सांगण्यात आले़ त्यानुसार नगरसेवकाच्या एका गाडीवर तसा
टॅग लावण्यात येईल़ सागरी सेतूवरून प्रवास करताना या गाडीकडून टोल वसूल करण्यात येणार
नाही़ (प्रतिनिधी)

Web Title: Free travel to C ++ links to the corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.