मुंबईतल्या एलटीटीवर प्रवाशांमध्ये फ्री-स्टाईल
By Admin | Updated: April 17, 2016 14:44 IST2016-04-17T10:08:34+5:302016-04-17T14:44:51+5:30
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर शनिवारी रात्री प्रवाशांमध्ये रांगेच्या वादातून हाणामारी झाली.

मुंबईतल्या एलटीटीवर प्रवाशांमध्ये फ्री-स्टाईल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७- मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर शनिवारी रात्री प्रवाशांमध्ये रांगेच्या वादातून हाणामारी झाली. कुर्ल्याच्या एलटीटीवर रांगेत उभे असतानाच काही प्रवाशांमध्ये वाद झाला. आणि त्यानंतर जोरदार हाणामारीला सुरुवात झाली.
या प्रकारानंतर रेल्वे पोलिसांनी 6 प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हाणामारी करणारे सर्व प्रवासी गोदान एक्स्प्रेसने जाणार असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली. सगळे जण रांगेत उभे असताना दोन गटांतल्या प्रवाशांमध्ये रांग लावण्यावरून वाद झाला. बघता बघता वाद अधिक वाढत गेला आणि प्लॅटफॉर्मवरच प्रवाशांनी फ्री-स्टाईल हाणामारी केली.
दरम्यान घटनास्थळी रेल्वे पोलीस हजर नव्हते. मात्र यावेळी प्लॅटफॉर्मवरील एका प्रवाशाने हाणामारीचा व्हिडीओ मोबाईलवर रेकॉर्ड केला आणि त्यानंतर पोलिसांना दाखवला. त्यानंतर कारवाई करत पोलिसांना सहा जणांना अटक केली आहे.