मोफत चिकन संजूबाबा......

By Admin | Updated: February 22, 2016 21:37 IST2016-02-22T21:37:38+5:302016-02-22T21:37:38+5:30

मुंबईतील भेंडी बाजार मधील नूर मोहम्मदी या हॉटेल मध्ये मोफत चिकन दिले जाणार आहे. संजय दत्तच्या आवडीचे चिकन असून त्याचे नाव चिकन संजूबाबा असे आहे.

Free chicken sanjubaba ...... | मोफत चिकन संजूबाबा......

मोफत चिकन संजूबाबा......

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - मुंबईतील बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त याची २५ फेब्रुवारी रोजी तुरूंगातून सुटका होणार आहे. त्याच्या चाहत्यामध्ये नक्कीच आनंदाचे वातावरण निर्माण झाले असेल. त्यात आनंदात भर पडणार आहे.
 
मुंबईतील भेंडी बाजार मधील नूर मोहम्मदी या हॉटेल मध्ये मोफत चिकन दिले जाणार आहे. संजय दत्तच्या आवडीचे चिकन असून त्याचे नाव चिकन संजूबाबा असे आहे.संजय दत्त सुटणार असल्यामुळे हॉटेल आपला आनंत संजय दत्तच्या चाहत्याबरोबर साजरा करत असल्याचे हॉटेलचे मालक खालिद हाकिम यांनी सांगीतले. 
 
साधारण ६ वर्षापुर्वी स्वत संजय दत्तने या चिकनची रेसेपी हॉटेलच्या मालकाला दिली होती, संजय दत्त च्या आवडीचे हा चिकनचा पदार्थ आहे. २५ फेब्रुवारीला दुपारी १२ ते रात्री १२ पर्यंत हॉटेल मध्ये चिकन संजू बाब हा अॅटम फ्री मध्ये दिला जाईल असे दुकानाचे मालक खालिद हाकिम यांनी सांगीतले

Web Title: Free chicken sanjubaba ......