बनावट जामिनदाराकडून न्यायालयाची फसवणूक
By Admin | Updated: May 9, 2014 22:27 IST2014-05-09T19:26:58+5:302014-05-09T22:27:05+5:30
जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन राहिलेल्या जामिनदाराने न्यायालयामध्ये बनावट शिधा पत्रिका आणि पॅन कार्ड सादर करुन न्यायालयाची फसवणूक केली.

बनावट जामिनदाराकडून न्यायालयाची फसवणूक
पुणे : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन राहिलेल्या जामिनदाराने न्यायालयामध्ये बनावट शिधा पत्रिका आणि पॅन कार्ड सादर करुन न्यायालयाची फसवणूक केली. न्यायालयाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.
भाऊसाहेब दामु क्षिरसागर (वय ४३, रा. क्रांतीनगर वसाहत, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या सहायक अधिक्षक मंजिरी आनंद कुलकर्णी (वय ५४, रा. अमृतवेल सोसायटी, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यामधील अटक आरोपी मुजम्मील उर्फ मुन्ना जाकीर अन्सारी (वय २०, रा. ज्योतीबानगर, काळेवाडी) या जामीन देण्यासाठी क्षिरसागर हा जामीन राहीला होता. त्याने गुरुवारी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.