शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

विमा योजनेच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 5:25 AM

सुरेंद्र राऊत यवतमाळ : सरकारी रुग्णालयात राष्टÑीय स्वास्थ्य विमा योजनेच्या नावाखाली दुकानदारी थाटून रुग्णांची लुबाडणूक करण्याचा प्रकार ‘लोकमत’मुळे उघडकीस आला. गत १८ दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराबाबत अधिष्ठात्यांसह रुग्णालय प्रशासन अनभिज्ञ असल्याचे पुढे आले.यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागासमोर कक्ष थाटून काही तरुणांनी राष्टÑीय स्वास्थ्य विमा योजनेची नोंदणी सुरू ...

सुरेंद्र राऊत यवतमाळ : सरकारी रुग्णालयात राष्टÑीय स्वास्थ्य विमा योजनेच्या नावाखाली दुकानदारी थाटून रुग्णांची लुबाडणूक करण्याचा प्रकार ‘लोकमत’मुळे उघडकीस आला. गत १८ दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराबाबत अधिष्ठात्यांसह रुग्णालय प्रशासन अनभिज्ञ असल्याचे पुढे आले.यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागासमोर कक्ष थाटून काही तरुणांनी राष्टÑीय स्वास्थ्य विमा योजनेची नोंदणी सुरू केली होती. रुग्णालयात येणाºया गोरगरीब जनतेकडून शंभर रुपये वसूल केले जात होते. ही योजना एपीएल आणि बीपीएल कुटुंबासाठी असून वार्षिक विमा योजना असल्याचे ते सांगत होते. यासाठी एक अर्ज भरून घेऊन शंभर रुपये घेण्यात येत होते. विशेष म्हणजे, अर्जावर कोणताही क्रमांक नव्हता. तसेच कुटुंबाची केवळ जुजबी माहिती घेतली जात होती. कुटुंब प्रमुखाचे आधार, रेशन कार्ड, वीज बिल आणि दोन फोटो मागविले जात होते. हा अर्ज भरल्याची रीतसर पावतीही दिली जात नव्हती.याबाबत चौकशी केली असता अधिष्ठात्यांच्या आदेशाने हा प्रकार सुरू असून, लोहारा येथील आशिष गोल्हर नामक तरुण तालुका समन्वयक असल्याचे सांगितले. आशिष यांच्याशी मोबाइलवरून संपर्क केला असता त्याने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या निर्देशावरून ही योजना राबवित असल्याचे सांगितले. प्रस्तुत प्रतिनिधीने अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे विचारणा केल्यावर शासनाकडून असा कोणताच कार्यक्रम राबविला जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शासकीय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सुरू असलेला विमा कार्ड योजनेचा प्रकार पूर्णत: नियमबाह्य आहे. त्यांना कोणतीही परवानगी दिलेली नाही. शिवाय अशी कुठलीही योजना नसल्याने या प्रकरणाची तक्रार पोलिसात देत आहोत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी दिली.